Explore

Search

Monday, December 23, 2024, 11:32 pm

Monday, December 23, 2024, 11:32 pm

Latest News

स्वत:च्याच मुलांना रागावताना करावा लागेल 10 वेळा विचार; आई ओरडल्याने चिडलेल्या लेकीने थेट ट्रेनसमोर…

Share This Post


आजकाल मुलांना ओरडण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण छोट्याशा मुद्यावरूनही मुलं डोक्यात राग घालून घेतात आणि अशी एखादी , नको ती कृती करतात, ज्यामुळे एक क्षणात होत्याचं नव्हतं होऊ शकतं.

मुलांना शिस्त लागावी, वाईट सवयी लागू नयेत, त्यांचं आयुष्य चांगलं घडावं यासाठी आई-वडील त्यांना कधीकधी ओरडतात. त्यात काही गैर नाही. गेल्या कित्येक पिढ्यांपासून हे सुरू आहे. मात्र आजकाल मुलांना ओरडण्यापूर्वी 10 वेळा विचार करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण छोट्याशा मुद्यावरूनही मुलं डोक्यात राग घालून घेतात आणि अशी एखादी , नको ती कृती करतात, ज्यामुळे एका क्षणात होत्याचं नव्हतं होऊ शकतं.

आई ओरडली म्हणून रागावलेल्या मुलीने टोकाचं पाऊल उचलल्याची अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमध्ये घडली. मथुरा येथे ही दुर्दैवी घटना घडली असून अवघ्या 13 वर्षांच्या लेकीने रेल्वे रुळावर जाऊन ट्रेन समोर उडी मारून स्वत:चं अनमोल आयुष्य एका क्षणात संपवून टाकलं.

शाळेत जायला नकार दिला म्हणून आई रागावली, पण…

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मथुरा येथे राहणारी ही 13 वर्षांची मुलगी शाळेत जाण्यास तयार नव्हती. त्याच मुद्यावरून तिचं आईशी भांडण झालं. काहीही झालं तरी शाळा बुडवायची नाही, ऊठ आणि सरळ शाळेत जा, असं सांगत तिची आई तिला ओरडली, एखाद-दुसरा धपाटाही तिने लेकीला घातला.

पण या सगळ्याचा त्या मुलीला प्रचंड राग आला. आई आपल्या चांगल्यासाठी सांगत्ये, हे लक्षात न घेताच त्या मुलीने राग डोक्यात घालून घेतला आणि ती घराबाहेर पडली. पण घरातून निघाल्यावर ती शाळेत गेलीच नाही. उलट संतापाच्या भरात ती अलवार- मथुरा रेल्वे ट्रॅकजवळ पोहोचली आणि समोरून येणाऱ्या ट्रेनखाली तिने स्वत:ला झोकून दिलं.

या संपूर्ण घटनेने मथुरा शहरात एकच खळबळ उडाली. अवघ्या 13 वर्षांच्या मुलीने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे सगळेच मुळापासून हादरले. तिच्या घरच्यांची अवस्था तर अतिशय बिकट झाली. आपण ओरडलो म्हणून मुलीने थेट आयुष्यच संपवलं, हे ऐकून तिच्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

puneherald
Author: puneherald


Share This Post

Leave a Comment

विज्ञापन