Explore

Search

Tuesday, December 24, 2024, 12:08 am

Tuesday, December 24, 2024, 12:08 am

Latest News

धुक्याचा अंदाज आला नाही अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं… कार-टेम्पोच्या धडकेत तिघांचा मृत्यू

Share This Post


दाट धुक्याचा अंदाज न आल्यामुळे पुण्याजवळील मंचर येथे एक भीषण अपघात झाला. पुणे नाशिक महामार्गावर मंचर येथे क्रूझर गाडी आणि मालवाहू टेम्पोची धडक बसल्याने ही दुर्घटना घडली. ही धडक एवढी भीषण होती, की त्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला.
सध्या सर्वत्र थंडीचे वातावरण आहे. गारवाही वाढला आहे. वाढत्या थंडीमुळे अनेक ठिकाणी धुकंही पडत असून या धुक्यामुळे अपघात होण्याची शक्यताही अधिक असते. याच दाट धुक्याचा अंदाज न आल्यामुळे पुण्याजवळील मंचर येथे एक भीषण अपघात झाला. पुणे नाशिक महामार्गावर मंचर येथे क्रूझर गाडी आणि मालवाहू टेम्पोची धडक बसल्याने ही दुर्घटना घडली. ही धडक एवढी भीषण होती, की त्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले असून त्यापैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. पहाटे रस्त्यावर दाट धुकं होतं, त्यामुळे रस्त्यावरील पुढची वाहने दिसत नव्हती. वेगाने जाणाऱ्या क्रूझर गाडीची मालवाहू टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक बसली आणि एकच गदारोळ माजला. त्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. पाच जण जखमी असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

puneherald
Author: puneherald


Share This Post

Leave a Comment

विज्ञापन