शरद पवार यांनी जुनी आठवण सांगताना म्हणाले की, मी केंद्रीय संरक्षण मंत्री असताना शेजारी असणाऱ्या राष्ट्राबरोबर संवाद साधत होतो. त्यामुळे आता या साऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही, आणि ते देशाला परवडणारंही नाही.
लोणावळा/पुणे : PUNE HERALD | राज्यातील राजकारणात अनेक विविध घटना घडामोडी घडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज राज्यातील अनेक भागातील अभियंत्यांनी भेट घेतली. त्याविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, आज माझ्याकडे राज्यामधील काही जिल्ह्यातून इंजिनीअर आले होते. यावेळी त्यांनी सांगितले की, आमचीसुद्धा समाजासाठी काम करण्याची इच्छा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हालाही प्रोत्साहित करुन आम्हाला मदत करावी अशी इच्छा व्यक्त केली. यावेळी शरद पवार यांनी राजकारण, समाजकारण आणि सत्ताकारणावर मत व्यक्त करत परिवर्तनासाठी सत्तेचा वापर केला पाहिजे असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
राजकारण केवळ सत्तेसाठी करायचं नाही, तर परिवर्तनासाठी सत्तेची गरज आहे. मात्र केवळ राजकारणासाठी सर्व काही करायचं नसतं असा टोला त्यांनी भाजप आणि शिवसेनेला लगावला.
राजकारणासाठी व्यापक दृष्टिकोन
विकासाच्या राजकारणासाठी व्यापक दृष्टिकोन ठेवला गेला पाहिजे. त्यामुळे विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे सल्ले गरजेचे असल्याचे सांगितले. ज्या प्रमाणे अभियंत्यांनी त्यांची इच्छा राष्ट्रवादीकडे इच्छा व्यक्त केली आहे, त्यासाठी म्हणून राष्ट्रवादी विविध क्षेत्रात सेल निर्माण करत असून त्याचे अनेक फायदेही होत आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितले.
चीन देशाबाबत चिंता
शरद पवार यांनी राज्यातील राजकीय घडामोडीबरोबरच आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारणावर बोलताना त्यांनी चीन आणि पाकिस्तानविषयी चिंता व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले की, आपल्या सगळ्यांना चीन देशाबाबत चिंता असते, तसेच मणिपूरबाबतही निवृत्त लष्कर अधिकारी चिंता व्यक्त करताना म्हणतात की आम्ही भारतीय आहोत ना? असा सवाल करणे हीच मोठी चिंता असल्याचे शरद पवारांनी यांनी सांगितले.
देशाच्या दृष्टीने हे चित्र वाईट असल्याचं निवृत्त लष्करी अधिकारी सांगत आहे. त्यामुळे ही स्थिती असताना राज्यकर्ते याकडे दुर्लक्ष करतात हे खेदजनक असल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारविषयी नाराजी व्यक्त केली.
केंद्र सरकारने लक्ष ठेवावे
त्याचबरोबर नॉर्थ ईस्ट आणि काश्मिरी यांच्यावर केंद्र सरकारने लक्ष ठेवावे लागणार आहे. त्यामुळे एकबाजूला चीन आणि दुसऱ्या बाजूला पाकिस्तान आहे. त्यामुळं इथल्या नागरिकांशी संवाद साधून त्या प्रदेशात शांतता राखायची जबाबदारी ही केंद्राची असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
देशाला हे परवडणारंही नाही
शरद पवार यांनी जुनी आठवण सांगताना म्हणाले की, मी केंद्रीय संरक्षण मंत्री असताना शेजारी असणाऱ्या राष्ट्राबरोबर संवाद साधत होतो. त्यामुळे आता या साऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही, आणि ते देशाला परवडणारंही नाही. त्यामुळे आम्ही 24 जून रोजी आम्ही सगळे भेटणार असून त्यामध्ये अनेक राज्याचे मुख्यमंत्र ही त्यामध्ये असतील आणि त्यावर चर्चा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.