Explore

Search

Monday, December 23, 2024, 4:18 pm

Monday, December 23, 2024, 4:18 pm

Latest News

पिंपरी-चिंचवडमध्ये 12 वर्षीय मुलीने जीवन संपवलं; वडिलांनी केला प्रकरणाचा तपास, खिश्यात मिळाली चिठ्ठी अन् कारण आलं समोर

Share This Post

पिंपरी चिंचवडमधील बारा वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या फ्रकरणाचा तिच्या वडिलांनी तपास करून सत्य बाहेर आणलं.

गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसरात मोठ्या प्रमाणावर लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. अस असतानाच एक धक्कादायक घटना काही दिवसांपुर्वी घडल्याचं समोर आलं होतं. Pimpri chinchwad मधील बारा वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. राहत्या घरात ही घटना 6 जून 2024च्या सायंकाळी बारा वर्षीय मुलीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची घटना घडली होती.

मात्र, तेव्हापासून या मुलीचे वडील अस्वस्थ होते. मुलीने असं टोकाचं पाऊल का उचललं असेल? घरात तर कोणी तिला काहीचं बोललं नाही? मग नेमकं काय घडलं? याचा शोध लावायचा चंग वडिलांनी बांधला. यासाठी तिच्या वस्तू आणि तिचे कपड्यांपासून तपासायला सुरुवात केली. तेंव्हा मुलीच्या ड्रेसच्या खिशात एक चिट्टी सापडली, त्यात मोबाईल नंबर आढळला. हा नंबर कुटुंबातील कोणाचाच नव्हता.  त्यामुळे वडिलांना शंका आली, मग आजूबाजूचे सीसीटीव्ही मिळवले. ते तपासले असता, त्यात दोन मुलं वारंवार तिच्या आसपास घुटमळत असल्याचं दिसून आलं.

यानंतर क्षितिज पराड आणि तेजस पठारे या दोघांनी मुलीचा वारंवार पाठलाग केला आणि तिचा लैंगिक छळ केला, त्याच त्रासाला कंटाळून मुलीने गळफास घेऊन तिने टोकाचं पाऊल उचलले असल्याचा आरोप वडिलांनी केला. नुकतंच याप्रकरणी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये पॉक्सोचा गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

puneherald
Author: puneherald


Share This Post

Leave a Comment

विज्ञापन