देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका अन् नितेश राणे यांना टोला; ‘या’ महिला नेत्याचं वक्तव्य चर्चेत, पाहा काय म्हणाल्या…
पुणे : PUNE HERALD | राष्ट्रवादीसोबत कधीच जाणार नाही म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती केली. बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले…, असं म्हणतात. पण देंवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं की, बोले तैसे न चाले त्याचे नाव देवेंद्र फडणवीस!, असं म्हणावं वाटतं, असं म्हणत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीसोबत कधीही युती करणार नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर 2019 ला एकदा राष्ट्रवादीला सोबत घेत सत्ता स्थापन केली. त्यानंतर आता 2023 मध्येही भाजपने राष्ट्रवादीतील अजित पवार गटासोबत युती केली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा त्या मुलाखतीतील व्हीडिओ व्हायरल होत आहे. त्याचाच संदर्भ देत सुषमा अंधारे यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.
नितेश राणे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे यांनी टोला लगावला आहे. आशा छोट्या आणि चिल्लर लोकांवर मी बोलणार नाही, असं त्या म्हणाल्यात.