पोलिसांना पुण्यातील के के मॉल जवळ एका लॉजमध्ये एका मुलीला डांबून ठेवल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी पीडित तरुणीची सुटका केली. ज्या लॉजवर हा प्रकार घडला आहे, त्या सर्व लॉज मालकांची देखील पोलीस आता चौकशी करणार आहेत.
पुणे शहर अत्याचाराच्या एका घटनेमुळे हादरले आहे. पुण्यात १७ वर्षीय तरुणीला १५ दिवस डांबून ठेवले. त्यानंतर तीन लॉजमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. वडिलांच्या आजारपणासाठी तिला उसने पैसे दिले होते. ते पैसे परत न दिल्याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. तसेच पैसे वसुलीसाठी 15 दिवस घरात डांबून ठेवत तिच्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला. या प्रकरणात आरोपी आणि त्याची पत्नी सहभागी झाली. या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
काय आहे प्रकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलीचे वडील आजारी होते. यामुळे त्या मुलीने आकाश माने आणि त्याची पत्नी पूनम यांच्याकडून उसनवार पैसे घेतले. वडिलांच्या उपचारासाठी ३० हजार रुपये तिने घेतले होते. मात्र काही कारणामुळे फिर्यादी त्यांना पैसे परत देऊ शकली नाही. यामुळे आकाश माने याने तिला एका लॉज वर नेऊन १५ दिवस डांबून ठेवले. त्या ठिकाणी आकाश माने वारंवार तिच्यावर अत्याचार करत होता.
जीवे मारण्याची धमकी, वेशव्याव्यसाय करून पैसे कमवले
आकाश माने अत्याचार करुन थांबला नाही. त्याने आणि त्याचे पत्नीने तिला जिवे मारण्याची धमकी दिली. तसेच जबरदस्तीने शरीर विक्रीस भाग पाडले आणि तिला वेशव्याव्यसाय करण्यास भाग पाडून पैसे कमावले. या प्रकरणी पुनम माने (२२) आणि आकाश माने (२४) या दाम्पत्यावर गुन्हा दाखल आहे. पुनम माने हिला पोलिसांनी अटक केली आहे तर आकाश माने फरार आहे.
अशी झाली सुटका
पोलिसांना पुण्यातील के के मॉल जवळ एका लॉजमध्ये एका मुलीला डांबून ठेवल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी पीडित तरुणीची सुटका केली. ज्या लॉजवर हा प्रकार घडला आहे, त्या सर्व लॉज मालकांची देखील पोलीस आता चौकशी करणार आहेत. पुण्यातील 3 लॉजमध्ये जाऊन वारंवार तिच्यावर आरोपीने अत्याचार केला. हा सगळा प्रकार मागील ऑक्टोबरपासून सुरू होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पोकसोसह इतर कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.