एका सराईत चोराला कळवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तो एवढा चलाख होता की पोलिसांना चकवण्यासाठी एकावर एक असे वेगवेगळे शर्ट घालायचा आणि मग चोरीसाठी बाहेर पडायचा. पोलिसांनी 250 हून अधिक सीसीटीव्ही तपासत चोरट्याला अटक केली.
गुन्हेगार… मग तो कोणीही. छोट्या मोठ्या चोऱ्या करणारा भुरटा चोर किंवा सराईत आरोपी, कधी ना कधी पकडला जातोच. ‘कानून के हाथ लंबे होते है’ असं म्हणतात, ते काही उगीचच नाही. एखादी छोटीशी चूकही गुन्हेगाराला अडकवण्यासाठी पुरेशी ठरते. सध्या गुन्ह्यांचे प्रमाणा बरेच वाढले असले तरी गुन्हेगारांना रोखण्यासाठी पोलिसही सज्ज असतात. अशाच एका सराईत चोराला कळवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तो एवढा चलाख होता की पोलिसांना चकवण्यासाठी एकावर एक असे वेगवेगळे शर्ट घालायचा आणि मग चोरीसाठी बाहेर पडायचा. बराच काळ तो हातातून निसटल्यानंतर, अखेर पोलिसांनीही त्याला सापळा रचून बेड्या ठोकल्याच.
मोहम्मद उर्फ सलमान करीब शहा सय्यद उर्फ जाफरी असे या इराणी चोरट्याचे नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे. पोलिसांनी ठाणे ते नाशिक या 80 किलोमीटर परिसरातील 250 हून अधिक सीसीटीव्ही तपासले आणि या सराईत गुन्हेगाराला शहापूर येथून त्याच्या मुसक्या आवळत अटक केली. तसेच त्याचे सहा गुन्हे उघडकीस आणत पाच लाख 70 हजारचा मुद्देमालही जप्त केला.
Author: puneherald
Post Views: 180