सध्या वर्ल्डकप क्रिकेटचा थरार सर्वत्र रंगला आहे. क्रिकेटचा हा थरार पाहण्यात क्रिकेटप्रेमी रंगले आहेत. त्याचवेळी सट्टा बाजारातील बुकी कोट्यवधींची उलाढाल करत आहेत. पुणे पोलिसांनी एका ठिकाणी छापा टाकला.
विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा चांगलीच रंगात आली आहे. या स्पर्धेत भारताने सर्व सामने जिंकून गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आहे. भारताच्या यशामुळे क्रिकेटप्रेमींचे प्रत्येक सामन्यावर लक्ष आहे. पुणे शहरात क्रिकेटचा थरार भारत-बांगलादेश सामन्यानंतर अधिकच रंगला. पुण्यात हा सामना झाला होता. आता क्रिकेट प्रेमी प्रत्येक सामन्यावर लक्ष ठेऊन आहे. त्याचवेळी बुकींनी सट्टा बाजार जोरात सुरु केला आहे. त्यात कोट्यवधींची उलाढाल होत आहे. पुणे पिंपरी चिंचवड शहरात सुरु असलेला सट्टा बाजार पोलिसांनी उघड केला. यावेळी बुकीला अटक केली असून लाखोंची रक्कम जप्त केली आहे.
पिंपरी कॅम्प आणि आसपासच्या परिसरात सट्टाचा बाजार अनेक स्पर्धेदरम्यान भरत असतो. क्रिकेट सामने, फुटबॉल, आयपीएल प्रिमीअर लीगमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल पिंपरी चिंचवडमधील सट्टा बाजारात होते. आता नुकताच झालेल्या इंग्लंड विरुद्ध साऊथ आफ्रिका दरम्यान झालेल्या क्रिकेट सामन्यावेळी कोट्यावधींचा सट्टा पिंपरीत सुरु होता. पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर गुंडा स्कॉड पथकाने छापा टाकला.