Explore

Search

Monday, September 29, 2025, 12:18 am

Monday, September 29, 2025, 12:18 am

Latest News

पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात दोन FIR ची नोंद का केली? पोलीस आयुक्तांनी न थांबता धडाधड सगळं सांगून टाकलं!

Share This Post

Error: Contact form not found.


पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात दोन एफआयआरची नोंद करण्यात आल्या होत्या. त्यावरुन राजकारण पेटलं होतं. अनेकांनी यावर टीका केली होती.त्यावर आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

पुणे : पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात दोन एफआयआरची नोंद करण्यात आल्या होत्या. त्यावरुन राजकारण पेटलं होतं. अनेकांनी यावर टीका केली होती. त्यानंतर पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोपदेखील करण्यात आला. त्यानंतर दोन एफआयआर का काढण्याचा आल्या, असा प्रश्न पुणे पोलिसांना विचारला जात होता. त्यावर आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. सुरुवातीला 304 अ कलम लावून एफआयआरची नोंद केली होती. मात्र या प्रकरणाची माहिती घेऊन दुपारी आम्ही 304 कलम वाढवण्यात आलं. हे सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याचे कलम आहे. हा एकच एफआयआर आहे, दोन नाही, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. 

पोलीस आयुक्त म्हणाले की,  शनिवारी रात्री घटना अडीचच्या सुमारास घडली. त्यानंतर आठच्या सुमरास  304 अ चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणाता घटनाक्रम घडल्यानंतर त्यानंतर त्यांच दिवशी 304 कलम वाढवण्यात आली होती . त्यात दिवशी बाल हक्क मंडळाकडे अर्ज केला. त्यानंतर हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे मुलगा सज्ञान असल्याचं समोर येत नाही. तोपर्यंत त्याला बाल सुधारगृहात ठेवण्यात यावं अशी मागणी केली होती. दोन्ही तक्रारी फेटाळण्यात आले होते. त्यानंतर आम्ही हायर कोर्टात अपील केलं होतं. त्यावेळी आम्ही पब मालक आणि अल्पवयीन मुलाचे वडिल विशाल अग्रवालवर गुन्हा दाखल केला होता. ज्युवेनाईल जस्टीसकडे पुन्हा गेल्यावर आता 14 दिवसांसाठी कोठडी देण्यात आली आहे. केस अत्यंत संवेदनशीलतेने हाताळत आहोत. आवश्यक पुरावे गोळा करतोय..ृ पुरावे नष्ट करण्याचा कोणी प्रयत्न केला का? याचाही तपास करतो आहोत. 304 कलम सिद्ध झालं तर 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते, असंही ते म्हणाले. 

या प्रकरणी जुवेनाईल कायद्याअंतर्गतदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात अल्पवयीन मुलाचे वडिल आणि पब मालकावर कारवाई करण्यात आली आहे. जुवेनाईल कायद्या 75 आणि 77 अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मुलगा अल्पवयीन असताना गाडी चालवायला देणे आणि अल्पवयीन मुलाला दारु सर्व करणे किंवा पबमध्ये एन्ट्री देणे हा गुन्हा आहे. त्यामुळे दोघांवरदेखील कारवाई करण्यात आली असतल्याचं आयुक्तांनी सांगितलं. आतापर्यंत फार कमी वेळा अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे, असंही ते म्हणाले. 

puneherald
Author: puneherald


Share This Post

Leave a Comment

विज्ञापन