पुणे शहरात अपहराणाचा थरार घडला होता. १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे तिच्या घरासमोरुन अपहरण करण्यात आले होते. आरोपींनाहॉटेल सुरु करायचे होते. त्यासाठी त्यांनी अपहरण केले होते. पण पुढे असे काही झाले की…
पुणे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. त्यासंदर्भात सर्वत्र चर्चा सुरु आहे. राजकीय मंडळांकडून सत्ताधारी पक्षाला घेरले जात आहे. यामुळे पुणे पोलिसांकडून अनेक उपाययोजना केली जात आहे. त्यानंतर गुन्हेगारी कमी होत नाही. पुण्यात नुकतेच १४ वर्षीय मुलाचेअपहरण करण्यात आले होते. त्या मुलाच्या घरासमोरुनच भरदिवसा तिघांनी तिचे अपहरण केले होते. अपहरणकर्त्यांना हॉटेल सुरुकरायचे होते. त्यासाठी त्यांनी अपहरण नाट्य घडवून आणले. परंतु या नाट्याचा शेवट असा काही झाला की आरोपींना कायमचालक्षात राहील.
कुठे घडला प्रकार
पिंपरी–चिंचवडमधील ताथवडे टाईमशिप जवळ ही घटना घडली. एका स्क्रॅप डिलरच्या मुलाचे अपहरण झाले. अपहणकर्त्यांनी काळयारंगाच्या झेन कारमधून हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून मुलाचे अपहरण केले. त्यानंतर मुलाच्या पालकांकडून ३० लाख रुपयांचीमागणी केली. या प्रकरणी त्यांनी पोलिसांना संपर्क केला. पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाच्या तपासासाठी एका तपास पथकाचीनियुक्ती केली गेली. आरोपींना केलेला फोनचा तपास केला. आरोपी सासवडला गेल्याचे स्पष्ट झाले.