Explore

Search

Monday, December 23, 2024, 11:16 pm

Monday, December 23, 2024, 11:16 pm

Latest News

The Search For The Robbery In Sangli But The Police Found A Car Bringing Liquor From Goa Sangli Solapur Police

Share This Post

Sangli Crime: सांगलीत रिलायन्स ज्वेलर्स शोरुममध्ये रविवारी (4 जून) भरदिवसा सशस्त्र दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा टाकत तब्बल 14 कोटींचे दागिने लुटले. दागिने लुटून मंगळवेढ्याच्या दिशेने दरोडेखोरांनी पलायन केल्याने घटनेची माहिती मिळताच सांगलीसह सोलापूरमध्येही नाकाबंदी करण्यात आली. सोलापूरचे पोलीस अधीक्षक शिरीषकुमार सरदेशपांडे यांनी ग्रामीण यंत्रणेवरुन नागरिकांना याबाबत कॉल करुन त्या गाडीचे वर्णन सांगत दरोडेखोरांना पकडण्याचे आवाहन केले होते. ते स्वत:ही सांगोला नाक्यावर थांबून वाहनांची तपासणी करीत असताना दरोडेखोरांचे वाहन सापडण्याऐवजी गोव्यावरुन 30 बॉक्स दारु घेऊन जाणारे वाहन पोलिसांना मिळाले. 

यावेळी आरोपींनी दारुच्या बाटल्या पोलिसांच्या अंगावर टाकून पळाले आणि पोलिसांच्या ताब्यातही मिळाले. रविवारी सायंकाळी गोव्यावरुन दारु घेऊन येणारे वाहन पोलिसांच्या गराड्यात सापडले. हे वाहन सांगोला येथे पोलिसांनी नाक्यावर पाहिल्यानंतर टोलवरील बॅरिकेट तोडून फरार झाले. पोलीस पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच आरोपींनी दारुच्या बाटल्या फेकून मारण्याचा प्रकार केला. 

चडचणमध्ये निघाली होती दारु

मंगळवेढ्यात ही गाडी पकडल्यानंतर यातील आरोपी स्वप्निल कोसेकर, शहाजी गायकवाड, असिफ मुजावर (सर्व रा.मोहोळ) यांना ताब्यात घेण्यात आले. ही दारु चडचण येथे विक्रीस जाणार असल्याचे चौकशीत आरोपींनी सांगितले. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. 

नेमका प्रकार काय घडला?

रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान मंगळवेढ्यात सांगोला नाक्यावर ही कारवाई झाली. पोलिस सुत्रांकडील माहितीनुसार सांगलीतील रिलायन्स ज्वेलरी लुटून मंगळवेढ्याच्या दिशेने (एमएच-07-क्यू-5599) जीपमधून निघाले. याची माहिती पोलिस अधीक्षक सरदेशपांडे यांनी कॉल करुन महामार्गावरील नागरिकांना गाडीचे वर्णन देऊन गाडी पकडण्याचे आवाहन केले होते. 

अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव, डीवायएसपी विक्रांत गायकवाड, गुन्हे अन्वेषण विभागाचे सुहास जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक पोटे व त्यांची टीम मंगळवेढ्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बापूसाहेब पिंगळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक सौरभ शेटे, पोलीस हवालदार श्रीमंत पवार, हजरत पठाण, युवराज वाघमारे, अस्लम काझी, सचिन वाघ, शिवाजी पवार यांच्या पथकाने शहर महामार्गावर सांगोला नाका येथे बॅरिकेट लावून वाहन तपासणी मोहीम सुरु केली.

प्रत्येक वाहनाची तपासणी सुरु असतानाच गोव्यावरुन दारु घेऊन येणारे वाहन पोलिसांच्या गराड्यात सापडले. हे वाहन सांगोला येथे पोलिसांनी नाक्यावर पाहिल्यानंतर टोलवरील बॅरिकेट तोडून फरार झाले. पोलिस त्यांचा पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच आरोपींनी दारुच्या बाटल्या फेकून मारण्याचा प्रकार केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.

इतर महत्वाच्या बातम्या

Source link

puneherald
Author: puneherald


Share This Post

Leave a Comment

विज्ञापन