पुणे शहरातून एक धक्कादायक घटना उघड झाली आहे. या घटनेमुळे पुणे हादरले आहे. पतीसमोरच पत्नीवर बलात्कार झाला आहे. हा बलात्कार कर्जाचे पैसे न दिल्याच्या कारणावरुन झाला आहे.
पुणे शहरात गुन्हेगारी वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी पेरुगेट पोलीस चौकीजवळ युवतीवर तिच्या मित्रानेच कोयत्याने हल्ला केला होता. त्या प्रकरणामुळे पुणे हादरले होते. आता पुन्हा पुण्यातून धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पतीने घेतलेले कर्ज दिले नाही, त्यामुळे त्याच्या पत्नीवर बलात्कार झाला आहे. शिक्षणाचे माहेर घर आणि सुस्कृंत शहर असलेल्या पुणे शहरात घडलेल्या या घटनेमुळे सर्वच हादरले आहेत. पुण्यात एका खासगी सावकाराने पती समोरच पत्नीवर बलात्कार केला आहे. तो येथेच थांबला नाही तर पुढे जाऊन आणखी धक्कादायक प्रकार त्याने केला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
काय झाला प्रकार
पुण्यातील इम्तियाज हसीन शेख (वय ४७) हा खासगी सावकारीचा व्यवसाय करतो. त्याच्याकडून पीडितेच्या पतीने 40,000 रुपये व्याजाने घेतले होते. त्याने हे पैसे परत न दिल्यामुळे शेख त्यांना शिवीगाळ करु लागला. त्यानंतर फेब्रवारी महिन्यात हडपसर सरकारी कॉलनीमधील एका निर्मनुष्य जागी त्यांनी बोलवले. त्यानंतर चाकू काढून धकमवले. त्यानंतर त्या व्यक्तीच्या पत्नीवर बलात्कार केला.
आरोपीने एमएमएस तयार केला
आरोपीने या घटनेचा एमएमएस तयार केला. त्यानंतर वारंवार यौन संबंध करण्याची मागणी केली. त्याला पीडितेने विरोध केला. त्यामुळे इम्तियाज हसीन शेख याने ती क्लिप सोशल मीडियावर टाकली. यामुळे ती महिला प्रचंड हादरली. तिला मोठा मानसिक धक्का बसला. शेवटी हिंमत करुन हडपसर पोलीस ठाणे गाठले अन् तक्रार केली.
पोलिसांनी केली अटक
पोलीस निरीक्षक रवींद्र शेलाके यांनी सांगितले की, महिलेची तक्रार येताच तपास करुन आरोपी याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवासांची पोलीस कोठडी मिळाली. महिला अत्याचाराविरोधात अनेक कायदे तयार केले आहे. परंतु त्यानंतर असे प्रकार वाढत असल्याने समाजातून चिंता व्यक्त केली जात आहे.