IND vs AUS 5th T20I | भारत आणि ऑस्ट्रेलियमधील पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने ४-१ असा विजय मिळवला. संपूर्ण मालिकेत कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जोरदार कामगिरी केली. या सामन्यातील टॉप मोमेंट्स जाणून घेऊ या…
भारत आणि ऑस्ट्रेलियामधील शेवटचा आणि पाचवा टी-20 सामना रविवारी झाला. या सामन्यात भारतीय संघाने सहा धावांनी विजय मिळवला. यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने ४-१ अशी आघाडी घेतली. कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या संघाने जोरदार कामगिरी केली. या सामन्यातील टॉप मोमेंट्स जाणून घेऊ या…
सूर्यकुमारला दुसऱ्या चेंडूवर जीवदान
टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याला दुसऱ्याच चेंडूवर जीवनदान मिळाले. त्यावेळी सूर्यकुमार एका धावेवर खेळत होता. परंतु त्याचा फायदा सूर्यकुमारला घेता आला नाही. पाच धावा करुन सूर्यकुमार बाद झाला. ड्वारशसच्या गोलंदाजीवर मॅक्डरमॉट याने त्याचा कॅच पकडला.
मॅक्डरमॉटचा मिसटाइम षटकार 98 मीटर
ऑस्ट्रेलियाचा बेन मॅक्डरमॉट याने 98 मीटर लांब षटकार ठोकला. या बॉलवर चेंडू टॉप एजवरुन बाउंड्रीचा बाहेर गेला. आवेश खानच्या शॉट पिच बॉलवर मॅक्डरमॉट याने पुढे येऊन शॉट मारला. बॉल मिड-विकेटवरुन स्टेडियमच्या छप्परवर गेला. मालिकेत सर्वात लांब षटकार ठोकण्याचा विक्रम भारताचा रिंकू याच्या नावावर आहे. त्याने चौथ्या सामन्यात 100 मीटर लंब षटकार ठोकला आहे.