शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर अजित पवार यांच्यासाठी दिलासा देणारा निर्णय आहे. निवडणूक आयोगानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. परंतु त्यापूर्वीच शरद पवार यांनी आपली तयारी सुरु केली आहे.
शिवसेना कोणाची ? या प्रश्नानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणत्या पवारांचा? या प्रश्नाचे उत्तर मंगळवारी मिळाले आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्ह घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला दिले. शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर अजित पवार यांच्यासाठी दिलासा देणारा निर्णय आहे. निवडणूक आयोगानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. परंतु न्यायालयाच्या निर्णय येण्यापूर्वी शरद पवार पुन्हा नव्याने उभारणीसाठी तयार झाले आहेत. सध्या शरद पवार दिल्लीत आहेत. दिल्लीवरुन परतल्यानंतर पुढच्या आठवड्यात ते कामाला लागणार आहे.
शरद पवार करणार राज्यव्यापी दौरा
शरद पवार राज्यव्यापी दौरा करण्याची शक्यता आहे. १५ ,१६ आणि १७ तारखेला शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघात करणार दौरा आहे. त्यानंतर १८ तारखेला शरद पवार यांचा पुरंदर दौरा असणार आहे. २१ तारखेला आंबेगाव दौरा करणार आहे. आंबेगाव राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील यांचा मतदारसंघात आहे. कधीकाळी दिलीप वळसे पाटील शरद पवार यांचे विश्वासू समजले जात होते.
लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार मैदानात उतरणार
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवार मैदानात उतरणार आहेत. यामुळे शरद पवार यांच्या दौऱ्याला आतापासून सुरुवात होणार आहे. शरद पवार राज्य पिंजून काढणार आहे. पुन्हा नव्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभारण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे. राज्यव्यापी या दौऱ्यात भाजपसोबत अजित पवार यांनाही ते लक्ष्य करणार आहेत.