Explore

Search

Monday, December 23, 2024, 11:42 pm

Monday, December 23, 2024, 11:42 pm

Latest News

Shahu Maharaj Says 349th Shivrajyabhishek Din In Kolhapur Will Be Celebrated In A Grand Manner At New Palace Kolhapur

Share This Post

Shivrajyabhishek Din Kolhapur Ceremony: कोल्हापुरात (Kolhapur News) उद्या (6 जून) नवीन राजवाड्यावर पहिल्यांदाच शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखदार पद्धतीने साजरा होणार आहे. शिवराज्यभिषेक दिनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. आज (5 जून) सकाळी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी या तयारीची पाहणी केली. उद्या (6 जून) सकाळी साडेसात वाजल्यापासून या सोहळ्याला सुरुवात होणार आहे. या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित राहणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णमूर्तीवर अभिषेक करण्यात येणार आहे.

शाहू महाराज छत्रपती यांनी हा शिवराज्याभिषेक सोहळा 349 वा असल्याचे सांगितले. एकीकडे संभाजीराजे छत्रपती रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत आहेत, तर दुसरीकडे नवीन राजवाडा या ठिकाणी शाहू महाराज, मालोजीराजे आणि संपूर्ण छत्रपती घराण्यातील सदस्यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे. दरवर्षी जुन्या राजवाड्यात साध्या पद्धतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होत होता. मात्र, यावर्षीपासून नवीन राजवाड्यावर खूप मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. 

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा 349 वा राज्याभिषेक सोहळा मंगळवारी दिनांक 6 जून 2023 रोजी सकाळी साडे सात ते दहा या वेळेमध्ये नवी राजवाड्याच्या प्रांगणात विविध कार्यक्रमांनी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होईल, याबाबतची माहिती छत्रपती घराण्याकडून देण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, सौ याज्ञसेनीराजे छत्रपती महाराणीसाहेब, मालोजीराजे छत्रपती, सौ. मधुरिमाराजे छत्रपती, यशस्विनीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती तसेच निमंत्रित आणि मंडळी उपस्थित राहणार आहेत.

शिवराज्याभिषेक सोहळा कार्यक्रम खालील पद्धतीने होतील

  • सकाळी साडेसात वाजता सनई चौघडा वादन 
  • आठ वाजता झांज पथकाचा कार्यक्रम 
  • साडेआठ वाजता मराठा लाईट इन्फंट्री बँड, बेळगाव यांचे वादन
  • नऊ वाजता शककर्ते श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुवर्णमूर्तीवर अभिषेक 
  • सव्वानऊ वाजता पोवाड्याचा कार्यक्रम 
  • साडेनऊ वाजता शौर्य गीते सादर केले जातील 
  • पावणेदहा वाजता मराठा स्फूर्ती गीत 
  • 9 वाजून 50 मिनिटांनी मर्दानी खेळ 

संभाजीराजे छत्रपती रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करणार 

दरम्यान, संभाजीराजे छत्रपती रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करणार आहेत. यासाठी जय्यत तयारी सुरु आहे. रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा हा राज्यातील लाखो शिवभक्तांसाठी एक सोहळा असतो. दरम्यान, 6 जून रोजी संपन्न होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पुर्वतयारीची पाहणी संयोगीताराजे छत्रपती यांनी केली आहे. त्यावेळी गडावरील कचरा शिवभक्तांसोबत गोळा करुन खाली आणण्यात आला. दुर्गराज रायगडवर 6 जून रोजी संपन्न होणाऱ्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त उत्सवमूर्तीला अस्सल सोन्यापासून बनवलेल्या 350 सुवर्णहोनांच्या प्रतिकृतींचा अभिषेक घालण्यात येणार आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

Source link

puneherald
Author: puneherald


Share This Post

Leave a Comment

विज्ञापन