अब्दुल रजा आहे मूळ हैदराबादला राहायला गेले. तरीही दरवर्षी न चुकता हैदराबादहून ते पुण्याला साखळीपीर तालीम मंडळात वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी येत असतात.
पुणे : जगद्गुरु संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पुण्यात दाखल झाला आहे. या पालखी सोहळ्यासोबत लाखो वारकरी ही पुण्यात दाखल झाले आहेत. या वारकऱ्यांची सेवा करण्याचे काम अनेक जणं करत असतात. जो तो आपल्या परीने वारकऱ्यांची सेवा करण्याचे काम करतात. मात्र मुळचे पुण्याचे असणारे सध्या हैद्राबाद येथे स्थायिक असणारे अब्दुल रजा हे गेल्या वीस वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा करण्याचे काम करत आहेत. सर्व जाती धर्माच्या पलीकडे जाऊन ते वारकऱ्यांची सेवा करतात. वारकऱ्यांची मालीश करून वारकऱ्यांचे दुःख दूर करण्याचे काम करतात.
वारीत न चुकता सेवा
या सेवेबाबत अब्दुल रजा म्हणतात की, वारकऱ्यांची सेवा करून मला आनंद मिळतो. माझा मालीश करण्याचा व्यवसाय असल्यामुळे मी बनवलेल्या तेलाचे ब्रॅण्डिंगही होत असते. म्हणून ह्या पंढरीच्या वारीच्या सणात दरवर्षी वारकऱ्यांचे सेवा करण्यासाठी या ठिकाणी येत असतो. मनात कुठलाही समतोल न ठेवता सेवा हीच धर्म या भावनेने अब्दुल रजा गेले वीस वर्ष वारकऱ्यांची न चुकता सेवा करतात.
आशीर्वाद मिळतो
पुण्याच्या रस्त्यावर वारकऱ्यांची मालीश करतात. गेल्या वीस वर्षांपासून हे काम करतो. यातून काही पेशंटही मिळतात. तेलाची जाहिरातही होते. वारकऱ्यांना खूप चांगले वाटते. गुरुंना आशीर्वाद मिळतो. शिवाय कामही मिळत असल्याचं अब्दुल रजा यांनी
सांगितलं.