Explore

Search

Tuesday, December 24, 2024, 10:52 pm

Tuesday, December 24, 2024, 10:52 pm

Latest News

पुणे-मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; ‘या’ भागांमध्ये स्फोट घडवून आणण्याचा इशारा.

Share This Post

मुंबई : PUNE HERALD | मुंबई व पुण्यात बॉम्बस्फोट करण्यात येणार असल्याच्या धमकीचा फोन पोलिसांना आलेला आहे. या फोनमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

मुंबई पोलिस सूत्रांनी सांगितले की, कॉलरने काल सकाळी 10 वाजता पोलिस कंट्रोलला कॉल केला आणि दावा केला की, 24 जून रोजी संध्याकाळी 6:30 वाजता मुंबईतील अंधेरी आणि कुर्ला भागात बॉम्बस्फोट होणार आहेत.

एवढेच नाही तर कॉलरने पुढे दावा केला की, आपल्याला दोन लाख रुपयांची गरज आहे आणि ही रक्कम मिळाल्यानंतर तो बॉम्बस्फोट थांबवू शकतो. तसेच पुण्यातही बॉम्बस्फोट होणार आहेत आणि तो स्वत: हा स्फोट घडवून आणतोय, त्यासाठी त्याला दोन कोटी रुपये मिळाले आहेत, असं त्यांना सांगितलं.

दोन लाख रुपये मिळाल्यास तो आपल्या माणसांसोबत मलेशियाला रवाना होईल, असा दावा कॉलरने केला आहे. पोलिस तपासादरम्यान कॉलरने हा फोन उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून केल्याचे तपासात समोर आले आहे.

अंबोली पोलिसांनी या संदर्भात आयपीसीच्या कलम ५०५(१)(बी), ५०५(२) आणि १८५ अन्वये गुन्हा दाखल केला असून ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. या कॉलमुळे पोलिस प्रशासन खडबडून जागं झालेलं आहे.

puneherald
Author: puneherald


Share This Post

Leave a Comment

विज्ञापन