पुणे शहरातील गुन्हेगारी वाढत असताना युवक-युवतींवर हल्ले होत आहेत. आता दर्शना पवार अन् कोयता हल्ला प्रकरणानंतर पोलिसांनी नवीन उपक्रम सुरु केला आहे. महाविद्यालयांमध्ये जाऊन हा उपक्रम राबवला जात आहे.
पुणे : PUNE HERALD | पुणे शहरात काही दिवसांपूर्वी एमपीएससी परीक्षा पास दर्शना पवार हिची हत्या झाली होती. तिचा मित्र राहुल हंडोरे यानेच ही हत्या केली होती. त्या प्रकरणास काही दिवस उलटत नाही तोच सदाशिव पेठेत भरदिवसा एका तरुणीवर कोयता हल्ला झाला होता. पुणे शहरात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न शांतनु जाधव याने केला होता. लेशपाल जवळगे या तरुणाने वेळीच जाधव याला रोखून धरल्यामुळे अनर्थ टळला. पंधरा दिवसांत पुणे शहरात घडलेल्या या दोन प्रकारामुळे पुणे पोलिसांवर टीका होऊ लागली आहे. यानंतर आता विविध पातळीवर पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहे. महाविद्यालयांमध्ये जाऊन पोलिसांनी उपक्रम सुरु केला आहे.
काय सुरु केला उपक्रम
पुणे पोलिसांनी युवक अन् युवतींमध्ये जागृकता निर्माण करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. त्यासाठी काही टीप्स जारी केल्या आहेत. तुम्ही जाणार आहात ते ठिकाणी सुरक्षित आहे का? ज्याच्यासोबत जाताय तो तुमची काळजी घेण्यास सक्षम आहे का? तुम्ही कुठे जाताय हे घरच्यांना कळवले आहे का? अशा टिप्स आता पुणे पोलिसांनी तरुण अन् तरुणींना दिल्या आहेत. दर्शना पवार हिच्या हत्येनंतर पुणे पोलिसांना युवा विचार परिवर्तन ही संकल्पना राबविण्यास सुरुवात केली. पोलिसांच्या या उपक्रमामुळे युवतींमध्ये जागृकता निर्माण होणार आहे.
पोलीस म्हणतात, मुलींनो हे कराच
रिक्षाने एकटी जाताना रिक्षेचा नंबर प्लेटचा फोटो काढा
प्रवास सुरु केल्यानंतर घरी फोन करुन या रिक्षेने बसली आहे, ती माहिती द्या. म्हणजे रिक्षावाल्यास कळेल की त्याची माहिती पोहचलेली आहे.
उशीरा रिक्षा मिळत नसेल तर पोलीस नियंत्रण कक्षाला संपर्क साधा
तुम्ही ज्याच्यबरोबर जात आहात ते ठिकाणी सुरक्षित आहे का? याची खात्री करा
ज्याच्याबरोबर जात आहात तो विश्वासाचा आहे का? ही जाणून घ्या.
सहलीला ग्रुपने जाताना सर्व जण परिचित आहे का? हे समजून घेऊन सहलीस जाण्याचा निर्णय घ्या.