Explore

Search

Monday, September 29, 2025, 12:22 am

Monday, September 29, 2025, 12:22 am

Latest News

कोणालाच नाही माहिती गौतमी पाटील हिचं खरं नाव, स्वतःच केला खुलासा

Share This Post

 

सबसे कातील गौतमी पाटील हिचं खरं नाव काय? गौतमी नाही तर, फार खास आहे तिचं नाव…, फार कमी लोकांना माहिती आहे गौतमी पाटील हिचं खरं नाव.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गौतमी हिच्या नावाची चर्चा…

लावणी डान्सर गौतमी पाटीलचे (Gaurami Patil) हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आपल्या भन्नाट डान्सने सर्वांना स्वतःच्या तालावर थिरकायला लावणारी गौतमी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील गौतमी एक मोठ्या कारणामुळे चर्चे आली आहे. आज प्रत्येक जण गौतमी हिला गौतमी या नावाने ओळखतो. पण तिचं खरं नाव गौतमी नसून वैष्णवी असं आहे. नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात गौतमी हिने स्वतःच्या नावाबद्दल मोठा खुलासा केला आहे.

जुन्नर तालुक्यातील केवाडी येथे आदिवासी नेते आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. कार्यकमात गौतमी हिला देखील बोलावण्यात आलं होतं. तेव्हा गौतमी हिने तिच्या एका चाहतीची भेट घेतली.

चाहतीसोबत गप्पा मारत असताना गौतमी हिने स्वतःचं खरं नाव सांगितलं. गौतमी हिने तिच्या चिमुकल्या चाहतीला तिचं नाव विचारलं. तेव्हा चाहतीने माझं नाव वैष्णवी आहे असं सांगितलं. यावर गौतमी म्हणाली, ‘माझं देखील जन्मनाव वैष्णवी असं आहे…’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त गौतमी हिच्या नावाची चर्चा रंगली आहे.

गौतमी पाटील हिचं आडनाव

गौतमी पाटील हिच्या आडनावावरुन वाद निर्माण झाला होता. गौतमी हिने पाटील हे आडनाव लावू नये असा इशारा देखील तिला देण्यात आला होता. “गौतमीचं खरं आडनाव पाटील नसून चाबुकस्वार आहे. पाटील आडनाव लावून ती पाटलांची बदनामी करतेय. तिने पाटीव नाव लावल्यास तिचे महाराष्ट्रात कार्यक्रम होऊ देणार नाही,” असा इशारा मराठा समन्वयकचे राजेंद्र जराड पाटील यांनी दिला आहे.

गौतमी पाटील हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. गौतमी हिच्या कार्यक्रमांना देखील चाहत्यांची मोठी गर्दी जमते. फक्त तरुणच नाही तर, वृद्ध आणि महिला देखील गौतमी हिच्या कार्यक्रमांना हजेरी लावतात. पण अनेकदा गौतमी वादाच्या भोवऱ्यात देखील अडकली आहे. गौतमी हिच्या कार्यक्रमांमध्ये राडा झाल्यामुळे कार्यक्रम अनेकदा बंद देखील करण्यात आले.

सांगायचं झालं तर, एखाद्या अभिनेत्रीलाही नसेल अशी गौतमी पाटीलची क्रेझ महाराष्ट्रभर निर्माण झाली आहे. सोशल मीडियावर देखील गौतमी हिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर येत असतात. गौतमी हिचा कार्यक्रम आणि कार्यक्रमाला प्रेक्षकांची गर्दी नाही असं कधीच झालेलं नाही. गौतमी हिची एक झलक पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.

puneherald
Author: puneherald


Share This Post

Leave a Comment

विज्ञापन