Explore

Search

Tuesday, December 24, 2024, 5:48 am

Tuesday, December 24, 2024, 5:48 am

Latest News

विहिरीचं बांधकाम सुरु असताना मुरुम ढासळलं, चार कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले !

Share This Post

इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे विहिरीचं काम सुरु असताना दुर्घटना घडली आहे. पोलीस, तहसिलदार, एनडीआरएफकडून बचावकार्य सुरु आहे.

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी गावच्या हद्दीत धक्कादायक घटना घडली आहे. विहिरीचं बांधकाम सुरू असताना रिंग पडून मुरुम ढासळले. यावेळी ढिगाऱ्याखाली चार कामगार गाडले गेल्याची घटना घडली. काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. सदर विहिर 120 फूट खोलं आहे. पोकलेनच्या सहाय्याने माती काढण्याचं काम सुरू आहे. बचावकार्यासाठी एनडीआरएफची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. घटनास्थळी पुणे ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग पुणे ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती, इंदापूरचे तहसिलदार श्रीकांत पाटील उपस्थित आहेत.

विहिरीचं बांधकाम सुरु असताना घडली दुर्घटना
इंदापूर तालुक्यातील सणसर गावातील रहिवासी विजय अंबादास क्षिरसागर यांची म्हसोबावाडी गावच्या हद्दीत कवडे वस्ती लगत जमिन आहे. या जमिनीत विहिरीच्या बांधकामाचे काम सुरु आहे. सदरची विहिर ही 120 फूट व्यासाची आणि 127 फूट खोल आहे. या विहिरीचं बांधकामाचं काम सुरु असताना काल रात्री त्यामध्ये रिंग पडली आणि मुरुम ढासळले. यामुळे ढिगाऱ्याखाली चार कामगार गाडले गेले आहेत.

कामगारांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरु
घटनेची माहिती मिळताच पोलीस, तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोकलेन मशिनच्या सहाय्याने मुरुम काढत कामगारांना बाहेर काढण्यासाठी काम सुरु आहे. रात्रीच्या सुमारास काम करताना कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली नव्हती का याबाबत तपास सुरु आहे.

puneherald
Author: puneherald


Share This Post

Leave a Comment

विज्ञापन