Explore

Search

Monday, December 23, 2024, 4:14 pm

Monday, December 23, 2024, 4:14 pm

Latest News

मल्याळम अभिनेता कोल्लम सुधी यांचा कार अपघातात मृत्यू

Share This Post

Kollam Sudhi: अभिनेता आणि मिमिक्री आर्टिस्ट कोल्लम सुधीचा (Kollam Sudhi) कार अपघातात मृत्यू झाला आहे. कोल्लम सुधी हा प्रवास करत असलेल्या कारची आणि एका वाहनाची धडक झाली. या अपघातात कोल्लम सुधीचा मृत्यू झाला. या अपघातात बिनू आदिमाली, उल्लास आणि महेश हे तीन मिमिक्री आर्टिस्ट जखमी झाले आहेत.

सोमवारी (4 जून) पहाटे साडेचारच्या सुमारास कैपमंगलम येथे कोल्लम सुधीचा अपघात झाला. एका रिपोर्टनुसार, कोल्लम सुधी, बिनू आदिमाली, उल्लास आणि महेश हे चौघे एका कार्यक्रमानंतर घरी परतत होते. तेव्हा त्यांच्या कारचा अपघात झाला. या अपघातात कोल्लम सुधीच्या यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला कोडुंगल्लूर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला. बिनू आदिमाली, उल्लास आणि महेश  या तिघांवर कोडुंगल्लूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेनं ट्विटरवर कोल्लम सुधीच्या निधनाची बातमी दिली. या ट्वीटला कमेंट करुन अनेक नेटकऱ्यांनी शोक व्यक्त केला आहे. प्रसिद्ध अभिनेते अजू वर्गीस यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन कोल्लम सुधीला श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच कलाभवन शाजोननं देखील सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन शोक व्यक्त केला आहे. 



कोल्लम सुधीचे चित्रपट

कोल्लम सुधीने 2015 मध्ये अजमल दिग्दर्शित ‘कंथारी’ या चित्रपटातून पदार्पण केले. कोल्लम सुधीने ‘कटप्पानायले ऋत्विक रोशन’, ‘कुट्टनादन मारप्पाप्पा’, ‘केसू ई वेदिन्ते नाधान’, ‘एस्केप’ आणि ‘स्वर्गथिले कत्तुरुम्बु ‘कोल्लम’ यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. विविध स्टेज शो आणि कॉमेडी कार्यक्रमांमुळे तो लोकप्रिय झाला.कोल्लम सुधीच्या निधनानं मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Gufi Paintal : महाभारतात ‘शकुनी मामा’ची भूमिका साकारणारे गुफी पेंटल यांचे निधन; मृत्यूशी झुंज अपयशी

Source link

puneherald
Author: puneherald


Share This Post

Leave a Comment

विज्ञापन