Explore

Search

Monday, September 29, 2025, 12:22 am

Monday, September 29, 2025, 12:22 am

Latest News

धनिकपुत्राच्या ब्लड रिपोर्टबाबत पोलीस आयुक्तांकडून महत्त्वाचं वक्तव्य, दोनवेळा सॅम्पल्स का घेतली?

Share This Post

Pune Herald : दोन्ही प्रकरणांचा तपास करुन आरोपीला शिक्षा मिळेल, यासाठी प्रयत्न करु. आम्ही विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु केली आहे. ते कोर्टात आमची बाजू भक्कमपणे मांडतील, असे अमितेश कुमार यांनी सांगितले.

पुण्यातील पोर्शे कार अपघातप्रकरणातील आरोपीच्या रक्ताच्या चाचणीबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एक महत्वाची माहिती समोर आणली आहे. रविवारी पहाटे अडीच वाजता अपघात (Pune Car Accident) झाल्यानंतर 11 वाजता अल्पवयीन आरोपीची पहिल्यांदा रक्ताची चाचणी (Blood Test) करण्यात आली. त्यानंतर संध्याकाळी एका खासगी रुग्णालयात आरोपीची पुन्हा एकदा ब्लड टेस्ट झाली. या दोन्ही ब्लड टेस्टचे नमुने फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले आहेत. आम्ही पहिल्या आणि दुसऱ्या ब्लड टेस्टचे नमुने एकाच व्यक्तीचे आहेत की, नाही हे तपासून घेण्यास सांगितले आहे. हे दोन्ही रक्ताचे नमुने आरोपीचेच आहेत का, याची खात्री अद्याप फॉरेन्सिक लॅबकडून झालेली नाही, असे अमितेश कुमार यांनी सांगितले.

पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत याप्रकरणाचा तपशील पुन्हा एकदा सांगितला. हा अपघात रविवारी पहाटे अडीच वाजता घडला. त्यानंतर साधारण आठ वाजण्याच्या सुमारास स्थानिक पोलीस ठाण्यात 304 अ  कलमातंर्गत गुन्हा दाखल झाला. मात्र, पोलिसांना पूर्ण घटनाक्रम कळाल्यानंतर दुपारी 12 वाजता आरोपीविरोधात 304 कलम लावण्यात आले. हे सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याचे कलम आहे.

puneherald
Author: puneherald


Share This Post

Leave a Comment

विज्ञापन