Explore

Search

Monday, December 23, 2024, 11:35 pm

Monday, December 23, 2024, 11:35 pm

Latest News

सोसायटीत खेळणाऱ्या चिमुकल्याला ज्येष्ठ नागरिकाची मारहाण, भेदरलेला मुलगा गंभीर आजारी

Share This Post


सोसायटीत खेळणं लहान मुलाला खूप महागात पडलं. सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या त्या मुलाला एका ज्येष्ठ नागरिकाने एवढी मारहाण केली की तो चिमुकला आजारीच पडला.

आजकाल मुलांना खेळायला फारशी जागा उरलेली नाही, त्यामुळे बऱ्याच वेळा मुलं सोसायटीच्या आवारात खेळत असतात. पण बोरिवलीमध्ये एका सोसायटीत खेळणं लहान मुलाला खूप महागात पडलं. सोसायटीच्या आवारात खेळणाऱ्या त्या मुलाला एका ज्येष्ठ नागरिकाने एवढी मारहाण केली की तो चिमुकला आजारीच पडला. ज्येष्ठ नागरिकाने दिलेला ओरडा आणि त्याने केलेली मारहाण याचा त्या मुलाने प्रचंड धसका घेतला. तो एवढा घाबरला की अनेक दिवस घराबाहेरच पडला नाही. सध्या तो गंभीर आजारी असून त्याला उपचारांसाठी डॉक्टरांकडे नेण्यापर्यंतची वेळ आली आहे. या प्रकारानंतर पीडित मुलाच्या पालकांनी बोरिवली पोलिसांत धाव घेत त्या ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध एफआयआर नोंदवला असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सोसायटीत खेळले म्हणून ओरडले 

मिळालेल्या माहितीनुसार, बोरिवली पश्चिमेला असलेल्या चिकूवाडी जवळील एका सोसायटीमध्ये 11 नोव्हेंबर रोजी संध्याकाळच्या सुमारास काही मुलं खाली खेळत होती. नेहमीप्रमाणे त्यांचा खेळ रंगला होता. मात्र त्यांच्या खेळण्याचा त्याच सोसायटीमधील एका ज्येष्ठ नागरिकाला त्रास होऊ लागला. त्याने त्या मुलांना गाठलं आणि इथे खेळायचं नाही असं सांगत तिथून हाकलण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही मुलांनी त्यांचं काही ऐकलं नाही आणि ते सगळे परत तिथेच खेळू लागले.

puneherald
Author: puneherald


Share This Post

Leave a Comment

विज्ञापन