रुपाली ठोंबरे-पाटलांचे विधान
मुंबई : PUNE HERALD | अजित पवार यानी घेतलेल्या शपतविधिला बंड म्हणणे चुकीचे आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये अजित पवार मित्र पक्ष म्हणून सहभागी झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जसा तह करायचे तसाच तह अजित पवारांनी केल्याचे नव नियुक्त राष्ट्रवादी प्रवक्त्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर रुपाली ठोंबरे-पाटील यांनीदेखील उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ दिली. रुपाली यांची राष्ट्रवादी प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ट्विट करत दिली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ठोंबरे-पाटील म्हणल्या की
‘गुवाहाटी किंवा कुठेही पळून अजित पवार राज्य सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार मित्र पक्ष म्हणून शिंदे-फडणवीस सरकारमध्ये गेलें आहे. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध जिंकण्यासाठी ज्या प्रकारे तह करायचे, तसाच अजित पवारांनी हा तह केला’.