Explore

Search

Monday, December 23, 2024, 8:34 pm

Monday, December 23, 2024, 8:34 pm

Latest News

तर अजित पवार मुख्यमंत्री होतील, भाजपच्या नेत्याचे मोठे विधान

Share This Post

 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल झाले आहेत. अनेक दिवसांपासून जी चर्चा होती, ते प्रत्यक्षात घडले. अजित पवार आपल्या एका गटासह भाजपमध्ये दाखल झाले. आता अजित पवार अन् भाजपमध्ये नेमके काय ठरलंय…

पुणे : PUNE HERALD | राज्यातील राजकारणात काहीही होऊ शकते, ही प्रतिक्रिया सर्वसामान्यांची झाली आहे. कारण २०१९ मध्ये शिवसेना-भाजप युतीला जनतेने निवडून दिले. परंतु सत्तेत शिवसेना, राष्ट्रवादी अन् काँग्रेस पक्ष आला. त्यानंतर वर्षभरापूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत आपल्या ४० आमदारांसह भाजपची साथ धरली. आता आठ, दहा दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार बाहेर पडले अन् त्यांच्या गटातील नऊ आमदारांसह सत्तेत आले. आता भाजपसोबत येताना अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदाचे आश्वासन दिले होते का? यासंदर्भात भाजप नेत्याने दावा केला आहे.

काय आहे दावा
भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी मोठं विधान केले आहे. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला असेल तर अजित पवार मुख्यमंत्री होतील, असे विधान संजय काकडे यांनी केले आहे. यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर काय ठरलंय ते पाहावं लागणार आहे. परंतु भाजपसोबत आल्याचा अजित पवार यांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे लोकसभेची जागा कोणाकडे
राज्यात लोकसभेच्या ४८ पैकी ४५ जागा भाजप अन् मित्र पक्षाला मिळतील. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, धनंजय मुंडे, सुनिल तटकरे यांचा आम्हाला फायदाच होणार आहे. पुणे शहरात भारतीय जनता पक्षाचे ९८ नगरसेवक आहेत. त्यामुळे ही जागा भाजपला मिळेल, असे त्यांनी सांगितले. पक्षात ज्याला संधी मिळेल तो पुणे लोकसभेची जागा लढवेल, असे संजय काकडे यांनी म्हटले आहे.

puneherald
Author: puneherald


Share This Post

Leave a Comment

विज्ञापन