मुंबई : PUNE HERALD | निवडसमितीच्या अध्यक्षपदी अजित आगरकर यांची नियुक्ती केली आहे. पण या निवडीनंतर त्यांना लॉटरी लागली आहे कारण त्यांच्या मानधनात तिप्पट वाढ करण्यात आली आहे. पूर्वी निवडसमितीच्या प्रमुखाला १ कोटी मिळायचे आता तीन कोटी मिळणार आहेत.
असे म्हटले जात होते की, भारताच्या कोणत्याच माजी खेळाडूंनी कमी पगार असल्यामुळे या पदासाठी उत्सुकता दाखवली नव्हती. मात्र, आता बीसीसीआयने तीन पटींनी मुख्य निवडकर्त्याचा पगार वाढवला आहे. आधी मुख्य निवडकर्त्याला वर्षाकाठी १ कोटी रुपये पगार मिळायचा.
भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य निवडकर्त्याला आधी वर्षाला १ कोटी रुपये मिळायचे. मात्र, आता यामध्ये तीन पटींनी वाढ झाली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, आता मुख्य निवडकर्त्याला वर्षाकाठी ३ कोटी रुपये पगार मिळेल. तसेच, निवड समितीतील इतर सदस्यांना ९० लाख रुपये वार्षिक पगार दिला जायचा, यामध्येही वाढ होईल. असे म्हटले जात आहे की, इतर सदस्यांच्या पगारात अद्याप वाढ करण्यात आली नाही.