Explore

Search

Monday, December 23, 2024, 8:39 pm

Monday, December 23, 2024, 8:39 pm

Latest News

बैलगाडा प्रेमी गोल्डमॅन पंढरी शेठ फडके यांचे निधन, कारमध्ये आला हृदयविकाराचा झटका

Share This Post

महाराष्ट्रातल्या बैलगाडा शर्यतीतील प्रसिद्ध नाव म्हणजे पंढरी शेठ फडके यांच हृदयविकाराचा झटक्यानं निधन झालं. दुपारी ऑफिस वरून घरी जाताना एक दीडच्या सुमारास कारमध्ये जाताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला.

पनवेलच्या विहिघरचे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडा मालक पंढरी शेठ फडके यांचे आज पनवेल येथे निधन झाले. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता.

बैलगाडा प्रेमी गोल्डमॅन म्हणून ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते. जिथे बैलगाडा शर्यत तिथे पंढरी शेठ फडके हे समीकरण अगदी ठरलेले होते. बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हावी म्हणून त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. जवळपास 40-50 शर्यतीचे बैल त्यांच्या दावणीला अजूनही आहेत

मुळचे पनवेलचे असणारे पंढरीशेठ फडके हे बैलगाडा शर्यतीचे शौकिन म्हणून ओळखले जातात. पंढरीनाथ फडके हे आधी शेकाप पक्षात सक्रिय होते. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 1986 सालापासून वडिलांमुळे फडकेंना बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली होती.

बैलगाडा शर्यतीच्या मैदानात त्यांच्या हटके एन्ट्रीची, त्यांच्या सोन्याची आणि गाडीच्या टपावर बसून शर्यत बघण्याच्या आगळ्या वेगळ्या स्टाईलची चांगलीच चर्चा असायची. बैल नजरेत बसला की कितीही पैसे लागू द्या, त्याला विकत घेणारा ‘बैल’मालक म्हणून पंढरीशेठ यांची ओळख होती. आज त्यांचं निधन झालं आहे.

आज दुपारच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. आपल्या ऑफिसवरून घरी जाताना कारमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. पंढरीशेठ यांच्या जाण्याने बैलगाडा शर्यत प्रेमींना मोठा धक्का बसला आहे.

puneherald
Author: puneherald


Share This Post

Leave a Comment

विज्ञापन