पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इयत्ता तिसरीमध्ये शिकणाऱ्या मुलाचा मृत्यु झाला आहे. शाळेत नेमकं असं काय घडलं की चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला.
पुण्यातील एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. शाळेतील विद्यार्थ्याचा खेळत असताना तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाला आहे. सार्थक कांबळे असं मृत पावलेल्या विद्यार्थ्यांचे नाव होतं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने त्याचा मृत्यू झाला. उपचारासाठी त्याला रूग्णालयात नेण्यात आलं होतं मात्र त्याचा आधीच मृत्यू झाला होता.
नेमकं काय घडलं?
काळेवाडीत राहणारा सार्थक हुतात्मा चाफेकर विद्यामंदिर शाळेत आठवीच्या वर्गात होता. बाराच्या सुमारास तो तिसऱ्या मजल्याच्या पायऱ्यांवरील लोखंडी रेलिंगवर खेळत होता. पण रेलिंगवर घसरगुंडी खेळणं धोकादायक होतं. याची कल्पना असल्यानं एका मित्राने तू इथं खेळू नकोस, खाली पडशील, तुला लागेक. असं म्हणत रेलिंगवरून खाली उतरण्याचा सल्ला दिला. मात्र त्याने तो ऐकला नाही.
सार्थक त्याच्याच धुंदीत होता त्याने काही ऐकलं नाही. अचानकपणे त्याचा तोल गेला अन तो थेट तळ मजल्याच्या डक्टमध्ये पडला. अशी माहिती सार्थकच्या मित्रांनी पोलिसांनी दिली. या अपघातात सार्थकला जोराचा मार लागला, तातडीनं त्याला रुग्णालयात हलविण्यात आलं. पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. चिंचवड पोलीस याप्रकरणी अधिकचा तपास करत आहेत.