सन 2022 मध्ये शेख याने फ्लॅटमध्ये पीडित मुलीला बोलावून घेतले. तेथे तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलीने प्रतिकार करत स्वतःची सुटका केली. त्यानंतर आरोपी मुलीला जाणीवपूर्वक त्रास देऊ लागला.
पुणे शहरात अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. “तुझे करिअर बनवेल, तू माझ्यासोबत रिलेशनमध्ये राहा”, ‘तुझ्या घरच्यांना फोन करून तुझे येथील मुलांबरोबर संबंध असल्याचे सांगेन”, असे सांगून निवासी अकॅडमीमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी संचालकासह एका माजी विद्यार्थिनीस अटक झाली. क्रिएटिव्ह अकॅडमीचे संचालक नौशाद शेख असे आरोपीचे नाव आहे.
कसा घडला प्रकार
पिंपरी चिंचवड शहरातील रावेत कॉर्नर या ठिकाणी आरोपी नौशाद अहमद शेख क्रिएटिव्ह अॅकेडमी अशी निवासी शाळा चालवतो. या निवासी शाळेत 2021 मध्ये पीडित मुलीने प्रवेश घेतला होता. त्यासाठी 2 लाख 26 हजार रुपये देखील भरले होते. प्रवेश झाल्यानंतर पीडित मुलगी क्रिएटिव्ह अॅकेडमीच्या हॉस्टेलमध्ये राहू लागली. तसेच या हॉस्टेलच्या पहिल्या मजल्यावर नौशाद शेख राहत होता.”तुझे करिअर बनवेल, तू माझ्यासोबत रिलेशनमध्ये रहा” असे म्हणत नौशाद शेख याने विद्यार्थिनीवर दाबाव आणला. त्यानंतर ती तयार झाली नाही. यामुळे लैंगिक अत्याचार केले ‘तुझ्या घरच्यांना फोन करून तुझे येथील मुलांबरोबर संबंध असल्याचे सांगेन” असे धमकावू लागला.
विनयभंग केला अन्…
सन 2022 मध्ये शेख याने फ्लॅटमध्ये पीडित मुलीला बोलावून घेतले. तेथे तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलीने प्रतिकार करत स्वतःची सुटका केली. त्यानंतर आरोपी मुलीला जाणीवपूर्वक त्रास देऊ लागला. नोव्हेंबर 2022 मध्ये देखील दिवाळीच्या सुट्टीमध्ये आरोपी शेख याने पीडित मुलीला तुला उटणे लावून अंघोळ घालून देतो, असे म्हणत तिचा विनयभंग केला. तसेच, पुन्हा अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, आरोपी मुलीसमोर आरोपीने पीडित मुलीबाबत अश्लील शेरेबाजी केली. त्यानंतर मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपी तरुणीनीने पीडित मुलीला शेख याच्याबरोबर संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव आणल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे