Explore

Search

Tuesday, December 24, 2024, 6:18 am

Tuesday, December 24, 2024, 6:18 am

Latest News

धक्कादायक, पुण्यात विदेशातून ऑनलाइन माध्यमातून वेश्या व्यवसाय, अभिनेत्रीसह तिघे ताब्यात

Share This Post

देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख आहे. परंतु पुण्यात अनेक प्रकारचे गैरकारभार सुरु आहे. मसाज सेंटर आणि स्पा सेंटरमधील प्रकार उघड झाल्यानंतर आता आंतराराष्ट्रीय पातळीवर होणारा ऑनलाइन वेश्या व्यवसाय उघड झाला आहे.

पुणे शहर सांस्कृतिक शहर आहे. देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याची ओळख आहे. परंतु पुण्यात अनेक प्रकारचे गैरकारभार सुरु आहे. पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू अनेक ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरु असतो. गेल्या सहा महिन्यांत अनेक मसाज सेंटर आणि स्पा सेंटरमधील हा वेश्या व्यवसाय उघड करत पोलिसांकडून आरोपींना अटक केली. पुणे शहरात कोयता गँग, शरद मोहोळ खून प्रकरणामुळे गँगवार आणि इतर गुन्हेगारीमुळे नागरीक घाबरलेले आहेत. तसेच खून, चोरी, लूटमारीच्या अनेक घटना पुणे तसेच पिंपरी चिंचवड या भागात घडल्या आहेत. त्याचवेळी वेश्या व्यवसायाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उघड झाले आहे. या प्रकरणात एका अभिनेत्रीसह तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

अभिनेत्रीसह मॉडेलवर कारवाई

पुण्यात हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा भांडाफोड पोलिसांनी केला आहे. वेश्या व्यवसाय करणाऱ्या राजस्थानी अभिनेत्रीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजस्थानी अभिनेत्रीसह दोन उजबेकीस्थानी मॉडेलला देखील पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुण्यातील विमान नगर परिसरात पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ही कारवाई केली.

विदेशातून ऑनलाइन माध्यमातून वेश्या व्यवसाय

उजबेकीस्थानमधून आलेल्या दोन मॉडेल ऑनलाइन वेश्या व्यवसाय करत होत्या. पुणे पोलिसांना यासंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला. राजस्थानी अभिनेत्री आणि उजबेकीस्थानमधून आलेल्या मॉडेलला या प्रकरणात अटक करण्यात आली. या तिन्ही महिला आरोपींनी पुण्यातील विमान नगर भागात गेल्या अनेक दिवसांपासून ऑनलाईन वेश्या व्यवसाय सुरु केला होता. विदेशातून ऑनलाइन माध्यमातून त्या वेश्या व्यवसाय भारतात चालवत असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.

वेश्या व्यवसाय ऑनलाइन पद्धतीने चालवणाऱ्या आरोपींचा पुणे पोलिसांकडून शोध सुरू आहे. दरम्यान या तिन्ही आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुणे शहरात अनेक ठिकाणी मसाज सेंटरच्या नावाखाली सर्रास अवैध धंदे सुरू असल्याचे प्रकार उघड झाले होते. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

puneherald
Author: puneherald


Share This Post

Leave a Comment

विज्ञापन