प्रकाश आंबेडकर यांच्या अटकेची मागणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. तसंच हे विधान केल्यानंतर थोड्याच वेळा पुन्हा प्रश्न विचारला असता राणे यांनी सारवासारव केली आहे. नारायण राणे पुण्यात बोलताना नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर…
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या अटकेची मागणी केली. पुण्यात बोलताना त्यांनी आधी आंबेडकरांच्या अटकेची मागणी केली. तर पत्रकारांनी पुन्हा प्रश्न विचारला असता नारायण राणे यांना सारवासारव केली. त्यामुळे नारायण राणे यांची भूमिका नेमकी काय? असा प्रश्न पुण्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात विचारला जात आहे. 6 डिसेंबरनंतर काहीही घडू शकतं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. त्यांच्या या विधानावर नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आधी म्हणाले अटक करा!
प्रकाश आंबेडकर असो किंवा इतर कुणी असो दंगलीविषयी बोलत असतील तर पोलिसांनी त्याची दखल घ्यायला हवी. त्यांची चौकशी करायला हवी. दंगलीची त्यांच्याकडे काय माहिती आहे. ती पोलिसांनी घेऊन दंगल रोखण्यासाठी कारवाई करावी. दंगल रोखण्यासाठी अटक देखील करायला हवी. प्रकाश आंबेडकर यांच्यावर एफआयआर दाखल करून त्यांना अटक व्हायला पाहिजे. त्यांना अटक करून दंगलीचा आधार काय आहे याची माहिती घ्यायला पाहिजे, असं नारायण राणे म्हणाले.
नंतर सारवासारव
प्रकाश आंबेडकर यांच्या अटकेबाबतच्या विधानावर पत्रकारांनी पुन्हा प्रश्न विचारला नारायण राणे यांनी सावरासावरव केली. प्रकाश आंबेडकर असो किंवा इतर कोणी… दंगली विषयी बोलत असेल तर, पोलिसांनी त्यांच्याकडून माहिती घ्यायला हवी. त्यांची चौकशी करायला हवी.दंगली रोखण्यासाठी कारवाई करायला हवी, असं आंबेडकर म्हणाले.
Author: puneherald
Post Views: 164