मुंबई : अभिनेते शैलेश लोढा यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेच्या निर्मात्याविरुद्ध खटला जिंकला आहे. शैलेश हे खटला जिंकल्याने निर्माते असित मोदी आता त्यांना दीड कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.
तारक मेहता का उल्टा चष्मा या विनोदी मालिकेत शैलेश हे तब्बल १४ वर्षे काम करत होते. निर्मात्यांनी पैसे न दिल्याने शैलेश यांनी मालिकेचे निमति असित यांच्याविरुद्ध राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (एनसीएलटी) कडे तक्रार दाखल केली होती. थकबाकी न दिल्याबद्दल खटला दाखल केला होता. हा खटला जिकल्यानंतर शैलेश यांनी याबाबत की,’ भांडण पैशांसाठी नव्हते. हा न्याय आणि स्वाभिमानाचा मुद्दा होता. सत्याचा विजय झाला आहे.’
Author: puneherald
Post Views: 249