जुळ्या मुलींची हत्या करून पत्नीलाही केले वाटेतून दूर.
पुणे: मुलगाच हवा या हव्यासापोटी गर्भवती सुनेला वेगवेगळ्या गोळ्या खाण्यास दिल्या. त्यानंतरही मुख्या मुली झाल्याने एका ठरावीक अंतराने मुलींची हत्या केली. पुढे पत्नीलाही वाटेतून दूर करण्यासाठी अपघाताचा बनाव करून हत्या केली. ही धक्कादायक आणि माणूसकीला काळिमा फासणारी घटना घडूनही पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याबाबत अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा आरोप मृत महिलेच्या भावाने केला आहे.
याबाबत भावाने न्यायालयाचे दार ठोठावले. घटनेनंतर तीन वर्षांनी न्यायालयाच्या आदेशानुसार हडपसर पोलिसांनी जुळ्या मुलींच्या मृत्यूबाबत अखेर खुनाचा गुन्हा दाखल केला. हा प्रकार डिसेंबर २०१८ ते २६२०१९ दरम्यान घडला. पोलिसांनी पुरावा नसल्याने सपास बंद केला होता. जुन्या मुलींच्या आईचाही अपघातात मृत्यू झाला असून हा अपघातही एक बनाव असल्याचा आरोप तिच्या भावाने केला आहे.
ही हेडलाइन कशामुळे?
मुलगाच हवा हा हट्ट कौर्याची आणखी किती सीमा गाठणार, हा प्रश्न विचारण्यासाठी आज ही बातमी हेडलाइना आता तरी आपण जागे होणार का? स्त्री-पुरुष विषमतेला संपवून
माणूस होणार का?
हडपसर ठाण्यात फिर्याद दिली. अधिक माहितीनुसार, ऊर्मिलाला मुलगा व्हावा यासाठी सासरच्यांनी मानसिक छळ केला. तसेच मूल गोरे व्हावे यासाठी वेगवेगळ्या गोळ्या खाण्यास दिल्या. मात्र ऊर्मिलाला जुन्या मुली झाल्या.
ऊर्मिलाने २६ नोव्हेंबर २०१९ रोजी मुलींना दूध पाजून झोपविले होते. सिद्धी रिद्धी या मुली झोपेत असताना बापाने सिद्धीला (वय ७ महिने) बाहेरील दूध पाजले. दूध श्वासनलिकेत गेल्याने गुदमरून सिद्धीचा मृत्यू झाला. त्यानंतर तीन महिन्यांनी ६ फेब्रुवारी २०२० रोजी दुसरी मुलगी रिद्धी (वय ९ महिने) हिचीदेखील तशीच हत्या केली.
दीर अमोल सूर्यवंशी हा वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित आहे. त्याला एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतरही त्याचे खरे कारण शवविच्छेदनात कसे येणार नाही, याची माहिती असल्याचे फिर्यादी यांचे म्हणणे आहे. याबाबत पोलिसांनी दखल न घेतल्याने फिर्यादीने न्यायालयात धाव घेतली होती.