वंदे भारत एक्प्रेस पुणे येथून सध्या सोलापूरसाठी जात आहे. तसेच या ट्रेनने मुंबईतसुद्धा पुणेकरांना येता येते. आता पुणेकरांना या गाडीसंदर्भात चांगली बातमी मिळाली आहे. या गाडीच्या तिकीट दर कमी होणार आहे.
देशभरातील 24 राज्यात आलिशान वंदेभारत एक्स्प्रेस सुरु झाल्या आहेत. देशभरात वंदेभारत 26 ठिकाणांहून सुरु झाल्या आहे. महाराष्ट्रातून एकूण चार ठिकाणांवरुन वंदेभारत एक्स्प्रेस सुरु आहेत. त्यात मुंबई ते गोवा एक्स्प्रेस नुकतीच सुरु झाली. त्यापूर्वी मुंबई गांधीनगर, मुंबई सोलापूर अन् मुंबई शिर्डी या गाड्या सुरु होत्या. दिल्ली ते वाराणसी या मार्गावर 15 फेब्रुवारी 2019 रोजी पहिली वंदेभारत एक्स्प्रेस सुरु झाली होती. परंतु आता पुणेकरांना वंदे भारत एक्स्प्रेससाठी केलेल्या नियमाचा फायदा होणार आहे.
देशात या ठिकाणी कमी प्रतिसाद
इंदूर-भोपाळ वंदे भारतला सर्वात कमी प्रतिसाद आहे. इंदूर भोपळ हे अंतर फक्त तीन तासात कापले जाते. या ठिकाणी वंदे भारत एक्स्प्रेसला जूनमध्ये केवळ 29 टक्के प्रवासी मिळाले. तसेच भोपळ ते इंदूर मार्गावर 21 टक्के प्रवासी मिळाले.
- मेक इन इंडिया ट्रेन
वंदे भारत ट्रेन ही नव्या युगाची रेल्वे गाडी आहे. तिला ‘मेक इन इंडिया’ मोहिमेंतर्गत तयार केली आहे. या गाडीची प्रवासी वाहण्याची क्षमता ही ‘शताब्दी एक्स्प्रेस’ पेक्षा अधिक आहे. वेग अन् आरामदायी प्रवासामुळे अनेक मार्गांवर तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु काही ठिकाणी तिकीट दर जास्त असल्यामुळे तिला प्रतिसाद कमी मिळत आहे. त्यामुळेच दर कपातीचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहेच.