Explore

Search

Tuesday, December 24, 2024, 7:38 am

Tuesday, December 24, 2024, 7:38 am

Latest News

रुपाली पाटील यांच्या जोरदार बॅटिंग, अजित पवार यांनी सत्तेत सहभाग कशासाठी घेतला हेही सांगितलं

Share This Post

काही कामं थांबली होती. ती सुरळीत व्हावीत, यासाठी अजित पवार यांनी मित्रपक्ष म्हणून शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे.

पुणे : PUNE HERALD | अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या, अजित पवार यांनी सरकारमध्ये सहभाग घेतला. मंत्रीपदाची शपथ राष्ट्रवादीच्या नऊ जणांनी घेतली. पण, अद्याप खातेवाटप झालेलं नाही. ते लवकरचं होईल. खातेवाटप झाल्यानंतर प्रश्न मार्गी लागतील. अजित पवार यांचे प्रशासकीय कौशल्य अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामावर, निधीवर स्थगिती आणली होती. छगन भुजबळ आणि कामगार यांनी याचिका दाखल केली होती. विरोधात असताना कायदेशीर न्याय मागायचा म्हणून याचिका दाखल केली होती. आता त्यांच्यासोबत मित्रपक्ष म्हणून सत्तेत आहोत. त्यामुळे याचिका वीड्राल करावी लागेल. ती वीड्राल होईल, असंही रुपाली पाटील यांनी सांगितलं.

म्हणून सत्तेत सहभाग
काही कामं थांबली होती. ती सुरळीत व्हावीत, यासाठी अजित पवार यांनी मित्रपक्ष म्हणून शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. विरोधात असताना थांबलेली काम पूर्ण करण्यासाठी सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. गलिच्छ राजकारण स्वच्छ करण्यासाठी सत्तेत आलो आहोत.

रायगडमधील अदिती तटकरे यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. असं असताना रायगडचा पालकमंत्री मी व्हायला हवा, असं भरत गोगावले यांचं म्हणणं आहे. अशावेळी गोगावले यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांना आपलं म्हणणं सांगावं. ते त्यांचे समाधान करू शकतील.

राष्ट्रवादी पक्ष शरद पवार, अजित पवार यांचा
राजकारणात कोणीतरी विरोधात तर कोणीतरी सत्तेत असतात. सत्तेत गेलो. काही आमदार सत्तेत गेले. त्यामुळे शरद पवार साहेब नाराज आहेत. अजित पवार आणि शरद पवार बसून हा प्रश्न सोडवतील, असा विश्वासही रुपाली पाटील यांनी व्यक्त केला.

विरोधात असताना संविधानिक पद्धतीने अजित पवार हे सत्तेत गेले आहेत. सरकारमधील लोकांना पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा यावर त्या म्हणाल्या, पक्ष हा शरद पवार आणि अजित पवार यांचा आहे.

 

puneherald
Author: puneherald


Share This Post

Leave a Comment

विज्ञापन