Explore

Search

Tuesday, December 24, 2024, 7:16 am

Tuesday, December 24, 2024, 7:16 am

Latest News

पाऊस पडताच पुणेकरांची पावले सिंहगडाकडे, विक्रमी पर्यटकांची झाली नोंद

Share This Post

 

गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरात चांगला पाऊस पडत आहे. पुणे शहरातील वातावरण बदलले आहे अन् शनिवार, रविवारची सुटी आली आहे. यामुळे सुटीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक सिंहगडाकडे जात आहे.

 

पुणे : PUNE HERALD | मान्सून यंदा उशीराने पुणे शहरात दाखल झाला. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनचे आगमन झाले. गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर अन् परिसरात चांगला पाऊस होत आहे. यामुळे वातावरण बदललेले आहे. त्यात शनिवार अन् रविवारी सुटी आली. यामुळे पुणेकरांनी पर्यटनाचा आनंद घेणे सुरु केले. पर्यटनासाठी अनेक पर्यटकांची पावले पुणे शहरातील सिंहगडाकडे वळली आहेत. यामुळे जून महिन्यातील सर्वाधिक पर्यटकांची नोंद रविवारी झाली आहे. पर्यटकांच्या होणाऱ्या गर्दीमुळे पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे.

 

पावसानंतर सिंहगडावर गर्दी

पुणे शहरात पावसाळी पर्यटनासाठी आता सिंहगडाकडे पुणेकरांची पावले वळत आहे. यामुळे सिंहगडावर गर्दी झाली आहे. पहिल्याच पावसात हजारो पुणेकरांनी सिंहगडाची सफर केली आहे. रविवारी एकाच दिवसात बारा हजार पुणेकरांनी सिंहगडावर हजेरी लावली आहे. सिंहगडावर रविवारी अडीच हजार दुचाकी गाड्यांची नोंद करण्यात आली. पहिला पाऊस आणि रविवारची सुट्टी साधत पुणेकरांनी पर्यटनाचा आनंद लुटला. सिंहगडावर जून महिन्यातील सर्वाधिक गर्दी रविवारी झाली. वनविभागाकडून पुढील पाच दिवस सिंहगडावर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

 

पुणे शहरात 30 जूनपर्यंत पाऊस

शनिवारी अन् रविवारी पुणे शहरात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर सोमवारीसुद्धा पावसाने हजेरी लावली आहे. आता 30 जूनपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. यामुळे पुणे परिसरातील धरणांमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे.

 

यंदा पाऊस चांगलाच

पश्चिमेकडून येणारा पाऊस हा संपूर्ण राज्यात होत नाही. आता सध्या सुरू झालेला पाऊस हा पूर्वेकडून आला आहे. तो संपूर्ण महाराष्ट्रात चांगलाच पडणार आहे. यंदाचा पावसाळा चांगल्या पावसाचा असणार आहे. यंदा पाऊस कमी पडणार नाही. कारण जमिनीचे तापमान वाढलेले आहे. अशी माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिली. यावर्षी राज्यात चांगला पाऊस पडणार आहे. कोणत्याही प्रकारचा दुष्काळ पडणार नाही, असा दावा हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी केला आहे.

 

puneherald
Author: puneherald


Share This Post

Leave a Comment

विज्ञापन