Explore

Search

Tuesday, December 24, 2024, 7:39 am

Tuesday, December 24, 2024, 7:39 am

Latest News

धन्यवाद, संजय राऊत!; अजित पवार असं का म्हणाले?

Share This Post

अजित पवार यांनी संजय राऊत यांचे आभार का मानले? वाचा सविस्तर…

 

पुणे : PUNE HERALD | विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांचे आभार मानले आहेत. धन्यवाद! संजय राऊत, असं अजित पवार म्हणालेत. संजय राऊत यांनी आज सकाळच्या पत्रकार परिषदेत अजित पवार यांना महाविकास आघाडीचे बीग बी म्हटलं आहे. त्याला अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी आदिपुरूष सिनेमावर प्रतिक्रिया दिली आहे.

 

वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी औंरगजेबच्या कबरीवर जात माथा टेकवला. त्यावर बोलताना औरंगजाबाबद्दल महाराष्ट्रात काय मत आहे हे सगळ्यांना ठावूक आहे. मात्र कोणी कुठे जायचे हे ज्याने त्याने ठरवायचे आहे, असं अजित पवार म्हणालेत.

 

राष्ट्रवादीची आमदारांची बैठक आधीच ठरलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील घडामोडींचा यांच्याशी काहीही संबंध नाही. महाविकास आघाडी आहे. उगीच काही बातमी चालवू नका, असं अजित पवार म्हणालेत.

 

विधीमंडळात ज्या विरोधकांकडे अधिक संख्या असते त्यांचा विरोधीपक्षनेता होतो. तुम्ही जे सांगताय त्याबद्दल आम्ही कोणता विचार केलेला नाही. मात्र तुम्ही ही गोष्ट लक्षात दिलीय त्यानंतर विचार करु. महाविकास आघाडीबाबातचा अंतिम निर्णय उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी घेतात. मी याबाबत उद्धव ठाकरे यांना विचारेन, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. गद्दार दिवस फार काही साजरा करण्यासारखा आहेत, असं मला वाटत नाही, असं त्यायंनी म्हटलं आहे.

 

पावसाने ओढ दिल्याने कारखाने वेळेवर सुरू होण्याबाबत साशंकता आहे. कारखाने कधी सुरु करायचा याचा अधिकार सरकारला आहे. मात्र धरणात पाणी नसल्याने ऊस पिकाला पाणी मिळणे अवघड झालं आहे. कारण पिण्याचे पाणी मिळणं अवघड आहे, असं अजित पवार म्हणालेत.

 

puneherald
Author: puneherald


Share This Post

Leave a Comment

विज्ञापन