दक्षिण मुंबईच्या महत्त्वाच्या आणि गजबजलेल्या चर्नी रोड येथील शासकीय वसतिगृहात तरुणीवर अत्याचार करत घडलेल्या हत्येच्या घटनेने मुंबई हादरली. त्यापाठोपाठ परीक्षेला निघालेल्या २० वर्षीय विद्यार्थिनीवर लोकलमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटनेने महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
धक्कादायक बात म्हणजे महिला अत्याचारामध्ये महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेश व राजस्थाननंतर महाराष्ट्रात अत्याचाराच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत.
महिला आयोगाकडून तक्रारींचा निपटारा
राज्य महिला आयोगाकडे ऑक्टोबर २०२१ ते मे २०२३ दरम्यान २६.६२९ तक्रारी आल्या. त्यापैकी १५ हजार ९२३ तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. ७०६ तक्रारीबाबत कार्यवाही सुरू आहे. यामध्ये मार्च महिन्यात सर्वाधिक २,०८६ तक्रारींची नोंद झाली होती. यामध्ये गेल्या वर्षी जानेवारी ते डिसेंबर दरम्यान ८.१५७ गुन्हे नोंद झाले तर, यावर्षी जानेवारी ते मे दरम्यान ४,८६३ तक्रारींचा समावेश आहे.
जवळच्या व्यक्तींपासून असुरक्षित
महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये आरोपी हे नातेवाईक, शेजारी, परिचित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे देशातील महिला जवळच्या व्यक्तीपासून असुरक्षित असल्याचेही वेळोवेळी पोलिसाच्या कारवाईतून स्पष्ट होत आहे.
महिलाविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्याच्या बाबतीत महाराष्ट्राचे नाव सुरुवातीच्या तीन राज्यामध्ये येते. एनसीआरबीच्या २०२१ च्या आकडेवारीनुसार, देशात महिलावरील अत्याचाराचे एकूण ४ लाख २८ हजार १७६ गुन्हे नोंदवण्यात आले. यापैकी सर्वाधिक गुन्हे उत्तर प्रदेशात १५६०८३) त्यानंतर राजस्थान [४०.७३८) आणि महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक (३९,५२६] लागतो.
हल्ले आणि त्यांच्या विनयभंगाचे सर्वाधिक गुन्हे ओडिशामध्ये (१४,८५३) त्यानंतर महाराष्ट्रात (१०,६५८) नोंदवण्यात आले होते.
४,४६२ २०२२-२३ मिरवण्यासाठी पसा खर्च कराल. स्थळांना भेटी दिल्या जातील. प्रट राहा. नवीन मित्र-मैत्रिणींना भेटण् मिळेल. टीप- रविवार, सोमवार,
शनिवार चांगले दिवस, बलात्कारांच्या घटनांच्या बाबतीत महाराष्ट्राचा (२,४१६) देशात चौथा क्रमांक लागतो. या यादीत राजस्थान (६,३३७) मध्य प्रदेश [२.९४७] आणि उत्तर प्रदेश [ २८४५] है पहिल्या तीन क्रमांकावर आहेत.
बाललैंगिक अत्याचारांच्या गुन्ह्यांच्या बाबतीतही महाराष्ट्रात ६.११६) उत्तर प्रदेशानंतर (६.९७०) सर्वात जास्त गुन्हे नोंदवण्यात आले.