Explore

Search

Tuesday, December 24, 2024, 10:48 pm

Tuesday, December 24, 2024, 10:48 pm

Latest News
Share This Post

 

पुण्यात सायबर चोरट्यांची कमाल, चक्क वाहनांना दिले योग्यतेचे बनावट प्रमाणपत्र.

 

पुणे शहरात फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. सायबर चोरट्यांकडून अनेकांची फसवणूक केली जातेय. आता या सायबर चोरट्यांनी सरकारी कार्यालयालाही सोडले नाही. त्यांनी वाहनांना बनावट योग्यतेचे प्रमाणपत्र दिले आहे.

 

पुणे : PUNE HERALD | ऑनलाइन फसवणुकीच्या घटना गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहे. ऑनलाईन फसवणूक करणारे सायबर चोरटे नवीन नवीन शक्कल लढवून अनेकांची फसवणूक करतात. यामध्ये अनेकांची आयुष्यभराची पुंजी गेल्याचे प्रकार पुण्यात घडले आहे. काही दिवसांपूर्वी पुणे जिल्हाधिकारींचा नावाचा अन् फोटोचा वापर सायबर ठगांनी केल्याचा प्रकार उघड झाला होता. दोन वेळा त्यांचे फेसबुकवर बनावट पेज केले होते. आता या सायबर ठगांनी पुणे परिवहन विभागावर हल्ला केला आहे.

 

काय केले सायबर ठगांनी

 

सायबर ठगांनी पुण्यातील चक्क आरटीओ कार्यालयावर सायबर हल्ला केला आहे. पुणे आरटीओ कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर सायबर चोरट्यांचा हल्ला केल्याचा प्रकार उघड झाला आहे. पुणे आरटीओच्या संगणकप्रणालीवर सायबर हल्ला करत त्यांनी ९ वाहनांचे बनावट योग्यता प्रमाणपत्र दिले आहे. वाहन निरीक्षकांचा लॉगिन आयडी अन् पासवर्ड देखील सायबर चोरटयांनी मिळवला अन् बनावट प्रमाणपत्र जारी केले. त्यांच्या या कृतीमुळे परिवहन विभागातील अधिकारी चांगलेच हादरले आहेत.

 

पोलीस ठाण्यात घेतली धाव

 

पुणे परिवहन विभागावर सायबर हल्ला झाल्याचा प्रकार समोर येताच अधिकाऱ्यांनी तातडीने पुणे सायबर पोलिसात धाव घेतली. या प्रकरणी ज्या संगणकावरुन हा प्रकार झाला त्या आयपी अॅड्रेसवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. आता हे सायबर ठग पुणे पोलिसांच्या हातात लागणार का? हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होईल.

 

 

 

puneherald
Author: puneherald


Share This Post

Leave a Comment

विज्ञापन