कंपनीत काम करणाऱ्या हेल्पर महिलेवर सुपरवायझरने लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी आरोपीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. हिंजवडी फेज …
पिंपरी : महा पोलिस टाईम्स | कंपनीत काम करणाऱ्या हेल्पर महिलेवर सुपरवायझरने लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी आरोपीला हिंजवडी पोलिसांनी अटक केली. हिंजवडी फेज २ येथील एका कंपनीत २६ मे रोजी हा प्रकार घडला.
- पीडित महिलेने याप्रकरणी मंगळवारी (दि. १३) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सूर्यकांत गणपती रामनल्ली (वय ३४, रा. हिंजवडी) याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही कंपनीत हेल्पर म्हणून काम करते, तर आरोपी हा कंपनीत सुपरवायझर आहे. त्याने २६ मे रोजी पीडितेवर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार केला. तसेच आरोपीने पीडित महिलेला धमकीही दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.
Author: puneherald
Post Views: 181