Explore

Search

Wednesday, December 25, 2024, 10:12 am

Wednesday, December 25, 2024, 10:12 am

Latest News

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर मोठा अपघात, पुण्यावरुन मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर तब्बल पाच किलोमीटरच्या रांगा

Share This Post

मुंबई- पुणे एक्स्प्रेसवर मंगळवारी मोठा अपघात झाला आहे. या अपघातानंतर वाहतूक थांबवण्यात आली आहे. एक्स्प्रेसवर वे वर एका ऑईल टँकरला आग लागली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.

पुणे : PUNE HERALD | मुंबई- पुणे एक्स्प्रेसवर मोठा अपघात झाला आहे. एक्स्प्रेसवर वे वर केमिकल टँकरला आग लागली आहे. या आगीत होरपळून दोघांचा मृत्यू झाला आहे. एक्स्प्रेसवर लोणावळा हद्दीत कुने गावाच्या ब्रीजवर एका टँकरला ही भीषण आग लागली. मंगळवारी दुपारी ही घटना घडली आहे. यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली असून आग विझविण्यास यश आले आहे. केमिकल टँकर पुलावर असताना लागलेल्या या आगीमुळे पुलाखालून जाणाऱ्या गाड्यांची हानी झाली आहे. पुण्यावरून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर तब्बल पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत.

कसा झाला अपघात

केमिकल घेऊन पुण्याहून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या टँकरच्या चालकाचा ताबा सुटला. यामुळे टँकर स्लिप झाला, या अपघाताने टँकर रस्त्यावर आडवा झाला. मग त्यातील केमिकल रस्त्यावर पसरले. खालून जाणाऱ्या मार्गावर ही केमिकल पसरले. त्यानंतर टँकरला आग लागली. खालील मार्गावर काम करणाऱ्या चार व्यक्तींवर हे केमिकल पडले. यात ते होरपळले. तर टँकरमधील आगीत होरपळले. महामार्गावरील खंडाळा घाटात हा अपघात झाला आहे. या ठिकाणी एका टँकरला आग लागली. आगीने पुलाखालील गाड्याही जळून खाक झाल्या. या आगीच्या ज्वाळा दूरवरून दिसत आहेत. पुलाखाली दोन ते तीन गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या. यामध्ये अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

puneherald
Author: puneherald


Share This Post

Leave a Comment

विज्ञापन