Satyaprem Ki Katha Trailer Release : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) आणि कियारा आडवाणी (Kiara Advani) सध्या ‘सत्यप्रेम की कथा’ (Satyaprem Ki Katha) या सिनेमामुळे चर्चेत आहेत. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरमध्ये कियारा आणि कार्तिकचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.
‘सत्यप्रेम की कथा’ या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये एका गुजराती जोडप्याची झलक पाहायला मिळत आहे. कियारा आणि कार्तिकच्या लव्हस्टोरी प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळणार आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर मात करताना कियारा आणि कार्तिक दिसणार आहेत.
‘सत्यप्रेम की कथा’ कधी होणार रिलीज? (Satyaprem Ki Katha Release Date)
‘सत्यप्रेम की कथा’ हा बहुचर्चित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठमोळी समीर विद्वांस या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. तर कमान साजिद नाडियाडवाला या सिनेमाची निर्मिती करत आहेत. ‘सत्यप्रेम की कथा’ हा सिनेमा 29 जून 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
कार्तिक आर्यन आणि कियारा आडवाणीची जोडी आधी ‘भूल-भूलैया 2’ या सिनेमात एकत्र झळकली होती. आता पुन्हा एकदा ‘सत्यप्रेम की कथा’ या सिनेमाच्या माध्यमातून कार्तिक-कियारा झळकणार आहेत. ट्रेलर रिलीज झाल्याने प्रेक्षकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. ‘सत्यप्रेम की कथा’ या सिनेमात कार्तिक-कियारासह गजराज राव आणि सुप्रिय पाठकदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
कार्तिक-कियाराच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घ्या… (Kartik Aaryan Kiara Advani Upcoming Project)
कार्तिक आर्यनचा ‘शहजादा’ हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला. पण बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात हा सिनेमा कमी पडला. तर दुसरीकडे कियाराचा ‘जुग जुग जियो’ हा सिनेमा गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींची कमाई केली. आता कार्तिक आणि कियाराचा ‘सत्यप्रेम की कथा’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. ‘कॅप्टन इंडिया’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’, ‘आशिकी 3’ आणि ‘भूल भुलैया 3’ कार्तिकचे हे आगामी सिनेमे आहेत. तर दुसरीकडे कियाराचे अदल बदल, आर सी 15 आणि मिस्टर लेले हे सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
संबंधित बातम्या