Explore

Search

Tuesday, December 24, 2024, 6:40 am

Tuesday, December 24, 2024, 6:40 am

Latest News

नीना गुप्ता विनोद करतात की लोकांनी तिच्या वाढदिवशी शोक व्यक्त केला पाहिजे

Share This Post

Neena Gupta: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) यांचा काल (4 जून) वाढदिवस होता. त्यांची मुलगी मसाबा गुप्ताने (Masaba Gupta) नीना यांचा खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मसाबानं नीना यांना बर्थ-डेनिमित्त दिलेलं गिफ्ट या व्हिडीओमध्ये दिसत आहे. नीना यांच्या या व्हिडीओची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

मसाबानं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, नीना गुप्ता या म्हणतात, ‘होय, माझा वाढदिवस आहे! माझ्या वाढदिवशी दिलेल्या  भेटवस्तूबद्दल धन्यवाद. मला असे वाटते की 60 वर्षांनंतर वाढदिवस आला की  लोकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याऐवजी शोक व्यक्त केला पाहिजे कारण आता जगण्याचे वय कमी होत आहे. मी घरी चांगले पदार्थ खाऊन वाढदिवस साजरा करणार आहे’ मसाबानं या व्हिडीओला कॅप्शन दिलं, ‘आज नीनाजींचा वाढदिवस आहे. सगळ्यांनी त्यांना शुभेच्छा द्या’ या व्हिडीओमध्ये मसाबानं नीना यांना गिफ्ट म्हणून दिलेलं प्रिंटेड जॅकेट दिसत आहे. 

पाहा व्हिडीओ: 


नीना गुप्ता यांनी हिट चित्रपटांमध्ये केलं काम

नीना गुप्ता या त्यांच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतात. बधाई दो, शुभमंगलम सावधान, गुड बाय आणि ऊंचाई या हिट चित्रपटांमध्ये नीना गुप्ता यांनी काम केलं. तसेच त्यांनी पंचायत, मसाबा मसाबा आणि पंचायत 2 या ओटीटीवरील वेब सीरिजमध्ये देखील प्रमुख भूमिका साकारली. पंचायत वेब सीरिजमध्ये त्यांनी साकारलेल्या मंजू देवी या भूमिकेचं अनेकांनी कौतुक केलं.  


नीना गुप्ता यांचे आगामी चित्रपट

लस्ट स्टोरीज 2, अनुराग बसूचा मेट्रो इन दिनो हा चित्रपट, रोमँटिक कॉमेडी पछत्तर का छोरा या नीना गुप्ता यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. नीना गुप्ता या सोशल मीडियावर देखील अॅक्टिव्ह असतात. त्यांना इन्स्टाग्रामवर 1.1 मिलियन फॉलोवर्स आहेत. नीना गुप्ता यांच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Neena Gupta: ‘मी तर पब्लिक प्रॉपर्टी आहे ना…’; परवानगी न घेता फोटो काढणाऱ्या व्यक्तीवर नीना गुप्ता भडकल्या, व्हिडीओ व्हायरल

Source link

puneherald
Author: puneherald


Share This Post

Leave a Comment

विज्ञापन