Explore

Search

Tuesday, December 24, 2024, 5:54 am

Tuesday, December 24, 2024, 5:54 am

Latest News

Aquarius Horoscope Today 05 June 2023 astrology-prediction-in-marathi-rashibhavishya

Share This Post

Aquarius Horoscope Today 05 June 2023 : कुंभ राशीच्या (Aquarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी असणार आहे. नोकरदारांना (Employees) दिलेली कामे वेळेवर पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आज तुम्हाला काही अधिकाऱ्यांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. आज दूरच्या नातेवाईकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्हाला शिक्षकांचे (Teacher’s) पूर्ण सहकार्य मिळेल. विद्यार्थी (Students) एका शहरातून दुसऱ्या शहरात शिक्षणासाठी (Education) जाऊ शकतात. घरबसल्या ऑनलाईन काम करणाऱ्या लोकांना आज खूप फायदा होईल. राजकारणात (Politics) यशाचे संकेत आहेत. आज तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ तुमच्या मुलांसाठी काढा, ज्यामध्ये तुम्ही त्यांच्याबरोबर त्यांच्या आवडी निवडीप्रमाणे मजा करा. तुम्हाला खूप ताजेतवाने वाटेल. गृहस्थ जीवनात (Married Life) सुख-शांती नांदेल. तुमचे प्रेम जीवन आनंदाने भरलेले असेल. 

व्यवसायिकांसाठी आजचा दिवस चांगला

कुंभ राशीच्या नोकरी व्यवसाय, व्यापारी आणि व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. व्यवसाय तसेच नोकरीच्या ठिकाणी नवा प्रकल्प हाती घेतला असेल, तर त्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आज तुम्ही दिलेली कामे वेळेवर पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. व्यवसायात दिवसेंदिवस प्रगती होताना दिसेल. वैद्यकीय क्षेत्रात कामाचा ताण वाढेल. आज महत्वाकांक्षा पूर्ण करण्याचा दिवस आहे, प्रयत्न करत राहा. 

तुम्ही ऑनलाईन व्यवसाय करत आहात, तुम्हाला त्यात यश मिळेल. दिवसाच्या सरत्या वेळी नातेवाईकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. कोणतेही काम करण्याआधी कुटुंबीयांना विश्वासात घ्या. तब्येतीची काळजी घ्या. 

आज कुंभ राशीचे आरोग्य 

ज्या लोकांना मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी आज आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. अशा वेळी गोड पदार्थांचं सेवन करू नका आणि तुमची औषधं वेळेवर घ्या.    

कुंभ राशीसाठी आजचे उपाय 

व्यवसायात प्रगतीसाठी आज संबंधित वस्तूंचे दान करा आणि गाईला हिरवा चारा खाऊ घाला

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, कुंभ राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 05 June 2023 : कर्क, धनु, मकर राशीच्या लोकांनी ‘या’ गोष्टींपासून सावध राहा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

Source link

puneherald
Author: puneherald


Share This Post

Leave a Comment

विज्ञापन